Family Fraud : कोट्यवधींचा विश्वासघात ! मामाने असं काय केलं की भाचीने दिली थेट तक्रार ?

Top Trending News    04-Jul-2025
Total Views |

 Family Fraud
 
नागपूर : ( Family Fraud )  रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी घटना नागपूर येथे घडली आहे. आई वडिलांची माया देणाऱ्याचा मामानेच भाचीची करोडो रुपयांची फसवणूक केली आहे. तिने मामावर विश्वास ठेवला आणि तिला विश्वासघात मिळाला ! हुडकेश्वर पोलिस ठाण्यात भाचीने तिचे काका, त्यांची पत्नी आणि मुलगा त्यासोबत इतर ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या संस्थेत अध्यक्षपदाचे आमिष दाखवून १.२८ कोटींची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
या प्रकरणातील आरोपींची नावे नीलकंठ दशरथ दहिरकर (६०), त्यांची पत्नी सविता नीलकंठ दहिरकर (५२), मुलगा आशु नीलकंठ दहिरकर (३०), राहुल धनोजी दहिरकर (३५) आणि गुलाब धोंडाबा दहिरकर (४५) अशी आहेत. हे सर्वजण वडसा, जिल्हा गडचिरोली येथील देसाईगंज येथील रहिवासी आहेत. तक्रारदाराचे नाव भारती संजय हरकाडे (५०) आहे, ती न्यू अमन नगर, मानेवाडा येथील रहिवासी ( Family Fraud ) आहे.

अध्यक्षपदासोबत नोकरीचेही आमिष
 
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी नीलकंठ हा तक्रारदार भारतीचा मामा आहे. सर्व आरोपी देसाईगंजमध्ये शांतीवन अपंग निराधार आदिवासी विकास शिक्षण संस्था चालवतात. भारतीने तिच्या तक्रारीत पोलिसांना सांगितले की, २०११ ते २०२४ दरम्यान आरोपीने तिला संस्थेचे अध्यक्षपद मिळवून देण्याचे आमिष दाखवून ४८ लाख रुपये घेतले. पैशांचा हा व्यवहार शाहू नगरमध्ये झाला. त्याची फसवणूक एवढ्यावरच थांबली नाही.
 
आरोपींनी भारतीकडून तिच्या बहिणीच्या पतीला संस्थेत नोकरी मिळवून देतो, असे आमिष दाखवून ४५ लाख रुपये घेतले. हा प्रकार आणखी पुढे वाढतच गेला त्यांनी पुन्हा आमिष दाखवून भारतीला तिच्या पतीला संस्थेचे उपाध्यक्षपद मिळवून देतो, असे सांगितले ( Family Fraud ) आणि त्यासाठी तिच्याकडे १५ लाख रुपयांची मागणी केली, पुन्हा एकदा भारतीची फसवणूक झाली.
 
४५ लाखांचा चेक बाऊन्स
 
भारतीप्रमाणे ते इतर नातेवाईकांना सुद्धा नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत राहिले. भारतीने त्यांना पैसे दिले आणि बराच काळ आपले काम होण्याची वाट पाहिली. आरोपींनी कोणालाही नोकरी मिळवून दिली नाही. त्यांनी भारतीला संस्थेचे अध्यक्षपदही दिले नाही. अखेर भारतीने त्यांना पैसे परत मागण्यास सुरुवात केली तेव्हा आरोपीने तिला ४५ लाख रुपयांचा चेक दिला. परंतु, बँक खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तो चेक बाउन्स झाला. या सर्व प्रकरणाला कंटाळून भारतीने पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला ( Family Fraud ) आहे.