Kawad Controversy : हरिद्वारहून कावड खरेदी करू नका, ते मुस्लिम तयार करतात ! स्वामी यशवीर महाराजांच्या विधानाने सर्वत्र खळबळ

Top Trending News    06-Jul-2025
Total Views |

kawad
 
मुझफ्फरनगरमधील स्वामी यशवीर महाराज ( Kawad Controversy ) यांनी आणखी एका वादाला तोंड फोडले आहे. यशवीर महाराजांनी कावड घेण्यासाठी जाणाऱ्या भाविकांना मुस्लिम कारागिरांनी बनवलेले कावड खरेदी करू नका, असे आवाहन केले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. स्वामी यशवीर महाराजांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये दावा करत, “हरिद्वारमध्ये ९०% कावड बनवण्याचे काम जिहादी टोळी (मुस्लिम) करते.” असे म्हटले आहे. पुढे ते म्हणाले की, “हे जिहादी लोक थुंकी आणि मूत्र मिसळून अन्न अशुद्ध करतात, त्यामुळे त्यांनी बनवलेले कावड देखील अशुद्ध असेल. त्यांनी शिवभक्तांना आवाहन केले की हरिद्वारमधून कावड खरेदी करण्याऐवजी त्यांनी त्यांच्या घरातून कावड बनवण्याचे साहित्य घ्यावे.”
 
त्यांनी सुचवले की, ”शिवभक्तांनी काठी, दोन लहान प्लास्टिकचे डबे किंवा भांडे घेऊन हरिद्वारला जावे आणि पवित्र गंगाजल भरून ते त्यांच्या काठीला बांधून ते कावडच्या स्वरूपात आणावे. त्यांच्या मते, असा कंवर शुद्ध असेल, तर हरिद्वारहून खरेदी केलेला ( Kawad Controversy ) कंवर अशुद्ध आणि तुटलेला असतो.”
 
सनातन धर्माच्या श्रद्धेवर प्रश्नचिन्ह
 
इतकेच नाही तर स्वामी यशवीर यांनी,”ज्यांच्या धर्मात मूर्तिपूजा, मूर्तीपूजेच्या वस्तू विकणे किंवा प्रसाद विकणे “हराम” मानले जाते. त्यांना सनातन धर्माचे कावड बनवण्याचा अधिकार कोणी दिला ? असा सवालच त्यांनी उपस्थित केला. पुढे ते म्हणाले की, “आम्हाला अशा लोकांवर अजिबात विश्वास नाही, कारण हा सनातन धर्माच्या आमच्या शुद्धतेचा आणि श्रद्धेचा प्रश्न आहे.” स्वामी यशवीर महाराज यापूर्वीही कंवर यात्रा मार्गावरील दुकाने आणि ढाब्यांवर नेमप्लेट लावल्यामुळे आणि ओळख मोहीम राबवल्यामुळे चर्चेत आले आहेत. अलिकडेच, उत्तराखंड पोलिसांनी त्यांना हरिद्वारमध्ये प्रवेश करण्यापासून रोखले होते, जेव्हा ते कंवर मार्गावरील हॉटेल आणि ढाब्यांची तपासणी करण्यासाठी जात ( Kawad Controversy ) होते.