Sanitary Pad Politics : सॅनिटरी पॅडवर राहुल गांधींचा फोटो ? बिहारच्या रणधुमाळीत नवा वादंग

Top Trending News    06-Jul-2025
Total Views |
 
rahul
 
पाटणा : ( Sanitary Pad Politics ) बिहारमध्ये निवडणुकीचे वर्ष आता नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी, काँग्रेससह महाआघाडीतील घटक पक्षांनी सत्तेत परत येण्यासाठी कंबर कसली आहे. बिहारमध्ये विजयासाठी काँग्रेसने महिला मतदारांना आकर्षित करण्याचे धोरण आखले आहे. महाराष्ट्रात महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेप्रमाणे बिहारमध्ये महाआघाडीची नाव लाडक्या बहिणीच किनाऱ्यावर लावतील, असे बिहार काँग्रेस नेत्यांचे मत आहे.
 
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राजेश कुमार यांनी राज्यातील विद्यमान सरकारवर निशाणा साधला आणि पक्षाच्या इतर कार्यक्रमांसाठी आगामी रणनीतीवर चर्चा केली. त्यांनी घोषणा केली की काँग्रेस पक्ष राज्यातील 5 लाख महिलांना सॅनिटरी पॅड वाटप करेल. तसेच गरजू महिलांना दर महिन्यात 2500 रुपये देईल. राजेश कुमार म्हणाले, बिहारच्या संदर्भात आम्ही महिलांसाठी विशेष तयारी केली आहे. राज्यातील महिलांना सॅनिटरी पॅड दिले जातील. हे सॅनिटरी पॅड प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवले जातील. यासाठी आम्ही एक मोहीम राबवणार आहोत. ते म्हणाले, आमचे ध्येय 5 लाख महिलांना सॅनिटरी पॅड वाटप करणे आहे. महिला काँग्रेस महिलांना आरोग्याबाबत जागरूक करेल. या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणुका प्रस्तावित आहेत. बिहारमध्ये महिला मतदारांची संख्या 3 कोटी 50 लाखांपेक्षा जास्त ( Sanitary Pad Politics ) आहे.
 
सॅनिटरी पॅडवर राहुल गांधींच्या फोटोने पेटला वाद
 
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोफत सॅनिटरी पॅड वाटप ( Sanitary Pad Politics ) सुरू केले. या पॅडच्या पॅकेटवर राहुल गांधींचा फोटो छापल्यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला. विरोधकांनी यावर महिलांचा अपमान झाल्याचा आरोप केला, तर काँग्रेसने याला महिला सशक्तीकरणाचं पाऊल म्हटलं. काँग्रेसने आणलेल्या सॅनिटरी पॅडच्या कव्हरवर (बॉक्स) राहुल गांधी यांचे चित्र आहे. सॅनिटरी पॅडच्या पॅकेटवर लिहिले आहे, माई-बहन मान योजना. अखिल भारतीय महिला काँग्रेस. तथापि, भाजपाने सॅनिटरी पॅडवर राहुल गांधींच्या फोटोवर आक्षेप घेतला आहे. भाजपा प्रवक्ते प्रदीप भंडारी म्हणाले, सॅनिटरी पॅडवरील राहुल गांधींचा फोटो बिहारच्या महिलांचा अपमान ( Sanitary Pad Politics ) आहे. काँग्रेस हा महिलाविरोधी पक्ष आहे. बिहारच्या महिला काँग्रेस आणि राजदला धडा शिकवतील.
 
मुख्यमंत्री नितीशकुमारांचे प्रयत्न
 
काँग्रेस देखील मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याप्रमाणेच बिहारमधील महिलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. महिला कल्याणासाठी चालवल्या जाणाऱ्या योजनांचा नितीशकुमार यांच्या यशात मोठा वाटा असल्याचे मानले जाते. नितीश सरकारने महिलांसाठी अनेक कामे केली आहेत. ज्यामुळे महिलांना खूप फायदा झाला आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पातही नितीश सरकारने महिलांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या होत्या. याशिवाय, बिहारमध्ये नितीश सरकारने लागू केलेल्या दारूबंदीचा सर्वाधिक फायदा महिलांना झाला आहे.
 
महिला मतांचा फंडा
 
सर्वत्र निवडणुकांमध्ये महिला मतदारांचे महत्त्व वाढत आहे. निवडणुकीपूर्वी विविध योजनांमधून महिलांच्या खात्यात पैसे जमा करणे ही विजयाची चिन्हे बनत चालली आहे. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचे पाच हप्ते पाठवण्यात आले. तिथे महायुती सरकार स्थापन झाले. मध्य प्रदेशात निवडणुकीपूर्वी लाडली बहना योजनेचे सहा हप्ते खात्यात जमा करण्यात आले. तिथे भाजपा सरकार स्थापन झाले. झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या सरकारने मैया योजनेचे तीन हप्ते महिलांच्या खात्यात पाठवले. सोरेन यांनी आघाडी सरकार स्थापन केले. दिल्लीत केजरीवाल हे काम करू शकले नाहीत. त्यामुळे आम आदमी पक्ष सरकार स्थापन करू शकला ( Sanitary Pad Politics ) नाही.