Nagpur Crime Story : हृदय सुन्न करणारा गुन्हा ! अर्धांगवायूग्रस्त पतीला प्रेमाच्या हव्यासात संपवलं

Top Trending News    08-Jul-2025
Total Views |

murder 
नागपूर : ( Nagpur Crime Story ) पती झोपेत असतांना त्याला यमसदनी पोहचविल्याची खळबळजनक घटना नागपुरातील वाठोडा परिसरात घडली आहे. विशेष बाबा म्हणजे पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही हत्या उघडकीस आली आहे. मृत पतीला पक्षाघात (लकवा) असल्याने तो योग्य तो प्रतिकार करण्यास असमर्थ होता. चंद्रसेन रामटेके (38) रा. साईनाथ सोसायटी (तरोडी खुर्द) असे मृताचे नाव आहे. प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीची हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला. दीशा चंद्रसेन रामटेके (30), आसिफ राजा (28) रा. राजनगर, वाठोडा अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
 
महालगाव येथील दिशासोबत 13 वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा असे अपत्य आहे. मोठी मुलगी 11 वर्षांची आहे. मृतक चंद्रसेन रामटेके (38) हा एका ट्रॅव्हल्स कंपनीत व्यवस्थापक म्हणून कामाला होता. त्याला दारूचे व्यसन होते. व्यसनामुळे त्याला अचानक दीड वर्षांपूर्वी अर्धांगवायू (लकवा) झाला. तेव्हापासून तो खाटेवरच होता. अशा परिस्थितीत घर चालविणे फारच कठीण झाले. त्यामुळे दिशाने वॉटर कॅनचा व्यवसाय ( Nagpur Crime Story ) सुरू केला.
 
अशा खडतर परिस्थितीत डिसेंबर 2024 मध्ये तिची ओळख राजा सोबत झाली. त्याच ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले. जानेवारी 2025 पासून त्यांचे प्रेम बहरत गेले. इकडे चंद्रसेन हा खाटेवरच असल्याने असमर्थ होता. दिशा काम आणि घर सांभाळून पतीचीही देखभाल करायची. राजाशी जवळीक वाढल्यापासून तिची पती चंद्रसेनकडे दुर्लक्ष व्हायला लागले. त्यामुळे तो दिशात आणि त्याच्यात सतत भांडण व्हायचे. सततच्या त्रासला ती कंटाळून गेली होती. तिने पतीची हत्या करण्याची योजना आखली. त्यासाठी आपल्या प्रियकराची म्हणजे राजाची ( Nagpur Crime Story ) मदत घेतली.
 
घटनेच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी तिने घरकाम उरकविले. मुलांना शाळेत पाठवून ती पाण्याची कॅन वाटपाचे काम लवकर करून दुपारीच घरी परतली. योजनेप्रमाणे राजाला तिने बोलावून घेतले. दुपारी 3 वाजताच्या सुमारास चंद्रसेन झोपला होता. तिने राजाच्या मदतीने चंद्रशेनचे उशीने नाक, तोंड दाबले तर राजाने त्याचा गळा आवळला. श्वास कोंडल्याने काही वेळातच त्याची हालचाल बंद झाली. पतीच्या मृत्यूची खात्री पटल्यानंतर राजा निघून गेला. चंद्रसेनचा मृतदेह दोन तास घरातच पडून होता. तर दिशा पुढची योजनेच्या तयारीत होती. सायंकाळच्या सुमारास दिशाने कांगावा केला. चंद्रसेन थंडगार पडलाय, कुठल्याही प्रकारची हालचाल करीत नाही, असा आरडा ओरड करू लागली. जवळपासचे लोक गोळा झाले. त्याला मेडिकल रुग्णालयात घेवून गेले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित ( Nagpur Crime Story ) केले.
 
असा लागला हत्येचा शोध
 
उशीने त्याचे नाक तोंड दाबून त्याची हत्या केली. चंद्रसेनच्या गळ्यावर काही व्रण दिसत असल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक हरिषकुमार बोराडे यांना शंका आली. शवविच्छेदन अहवालाची त्यांनी प्रतीक्षा केली. शनिवारी अहवाल येताच मृत्यूचे कारण स्पष्ट झाले. वैद्यकीय अहवालात गळा, नाक, तोंड दाबून श्वास कोंडल्याने मृत्यू झाल्याचे नमूद केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दिशा आणि राजाला अटक ( Nagpur Crime Story ) केली. न्यायालयाने दोघांनाही 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.