Cobra Rescue : मच्छरदानीत कोब्राची एन्ट्री ! थरारक रेस्क्यू ऑपरेशन

Top Trending News    19-Aug-2025
Total Views |

cobra
मयूरभंज : ( Cobra Rescue ) ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील सिमिलिपाल व्याघ्र प्रकल्पातील दुखरा वनक्षेत्रातील दहीसाही गावात एक थरारक घटना घडली आहे. एका युवकाच्या घरात कोब्रा शिरला आणि थेट मच्छरदानीत झोपलेल्या युवकाच्या शेजारी जाऊन शांतपणे झोपला. ही घटना सकाळी घडली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोबऱ्याने कोणताही हल्ला न करता युवकाजवळ निवांतपणे वावर केला. युवकाने प्रसंगावधान राखून शांत राहून कुटुंबातील सदस्याला वनविभागाच्या बचाव पथकाला बोलवायला सांगितले.
वनविभागाने सांगितले की, अलीकडील मुसळधार पावसामुळे अनेक साप आपली सुरक्षित ठिकाणे सोडून घरांच्या दिशेने जात आहेत. सामान्यतः कोब्रा माणसांपासून लांब राहतो, मात्र धोक्याची जाणीव झाल्यास ते आक्रमक होऊ शकतात. या घटनेत सापाचा संयमी आणि शांत वावर पाहायला मिळाला, ज्यामुळे मोठा अपघात टळला. प्रशिक्षित सर्पमित्र कृष्ण गोछायात घटनास्थळी पोहोचले. त्यांनी प्रथम युवकाला सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर काळजीपूर्वक कोबऱ्याला मच्छरदानीतून पकडून ( Cobra Rescue ) जंगलात सोडण्यात आले.