Map Mislead : मार्कंडेश्वर मंदिराला शोधणारी मित्रांची कार बुडाली नदीत ! मार्गदर्शकच ठरला जीवघेणा

Top Trending News    23-Aug-2025
Total Views |
 
Map Mislead
 
सहारनपूर : ( Map Mislead ) गुगल मॅपने केलेला विश्वासघात पुन्हा एकदा समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये गुगल मॅपच्या साहाय्याने चालणारी एक कार दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत पडली. ही कार धार्मिक यात्रेवर गेलेल्या मेरठ विद्यापीठातील विद्यार्थ्यांची होती. विद्यार्थी कसेबसे बाहेर पडले. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि गावकऱ्यांच्या मदतीने गाडी बाहेर काढण्यात आली. विद्यार्थी नेता सूर्या त्याचे तीन मित्र आदित्य, वरुण आणि अंशुल यांच्यासह अंबालाच्या शाहबाद शहरात असलेल्या महर्षी मार्कंडेश्वर मंदिरात जात होता. जेव्हा ते सहारनपूरच्या सारसावा परिसरात पोहोचले तेव्हा त्यांनी गुगल मॅपच्या ( Map Mislead ) मदतीने मंदिराचे स्थान शोधले.
 
मंदिराचे स्थान शोधाता शोधता नकाशाने त्यांना भुरळ घातली. त्यांना सिरोही पॅलेसजवळ एक छोटा मार्ग दाखवला. विद्यार्थ्यांनी त्या मार्गाच्या दिशेन्स मार्गक्रमण केले. काही अंतरापर्यंत रस्ता दिसत होता, पण अचानक तो पावसाळी नदीकडे वळला. कार चालवणाऱ्या आदित्यला समजले नाही की समोर खोल पाण्याने भरलेली पावसाळी नदी आहे. गाडी वेगाने नदीत पडली. या घटनेनंतर गाडीत बसलेले चारही विद्यार्थी घाबरले. गाडीत पाणी वेगाने भरू लागले, पण विद्यार्थ्यांनी धाडस दाखवले आणि गाडीच्या काचा खाली करून बाहेर पडण्याचा प्रयत्न ( Map Mislead ) केला.
 
चारही मित्रांनी गाडीतून उड्या मारल्या आणि पोहत बाहेर पडले. सुदैवाने, सर्वजण वेळेवर बाहेर आले. गाडी तलावात पडल्याची बातमी मिळताच जवळचे गावकरी घटनास्थळी पोहोचले. काही लोकांनी तातडीने पोलिसांना कळवले, ११२ वर फोन करण्यात आला. पोलिसांचे पथकही काही वेळात पोहोचले. गावकरी आणि पोलिसांनी मिळून खूप मेहनत घेत गाडी बाहेर काढली. गाडी पूर्णपणे पाण्यात बुडाली होती. मोठ्या मेहनतीने ती बाहेर काढण्यात यश आले.