श्रीगणेशाला ( Miracle Of Durva ) दुर्वा अत्यंत प्रिय आहेत. श्रीगणेशाला दुर्वा अर्पण केल्यास पूजा लवकर फलदायी होते. जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. दुर्वाशिवाय गणेशाची उपासना अपूर्ण मानली जाते. दुर्वा प्रत्येक शुभ कार्यात आवश्यक असते. श्रीगणेशाची कृपा प्राप्त करण्यासाठी शास्त्रामध्ये दुर्वाचे काही खास उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. दुर्वाचा वापर कसा करता येईल, याबाबत आज आपण जाणून घेऊया.
काम रखडलेले असेल तर
तुमचे काम रखडले असेल तर पांढऱ्या गाईच्या दुधात दुर्वा टाकून ते मिश्रण वाटन करून त्याचा रोज टिळा लावल्याने तुमची सर्व कामे यशस्वी होतात आणि नशीबही तुमची साथ देते असे सांगितले जाते.
बुधग्रह दोष
कुंडलीत बुध ग्रहाची स्थिती मजबूत करण्यासाठी बुधवारी गणेश मंदिरात जाऊन 11 दुर्वांची जुडी अर्पण करा, असे केल्याने गणपती भगवान प्रसन्न होतो आणि बुध दोषही दूर होतो. गणेशाला दुर्वा अर्पण करण्यासाठी ( Miracle Of Durva ) स्वच्छ जागेवरून ते तोडावे.
कलह नाशासाठी
जर कुटुंबात भांडणतंटा होत असेल किंवा घरातील सदस्यांमध्ये दुरावा आला असेल तर बुधवारी गायीला दूर्वा खाऊ घातल्याने घरगुती त्रास दूर होतात आणि लोकांमध्ये परस्पर प्रेमाची भावना ( Miracle Of Durva ) वाढू लागते.
आर्थिक अडचणींनासाठी
जीवनात आर्थिक समस्या कायम राहिल्यास किंवा कर्जामुळे त्रस्त असाल तर बुधवारी किंवा गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करून त्यांना 11 दुर्वाच्या पाच जुड्या अर्पण करा. तसेच दररोज गणेश स्तोत्राचे पठण करावे. असे केल्याने आर्थिक संबंधित समस्या दूर होऊन, कर्जही कमी होते.
नोकरी आणि व्यवसायात प्रगतीसाठी
नोकरी आणि व्यवसायात प्रगतीसाठी बुधवारी 11 किंवा 21 दुर्वाच्या गाठी करून अर्पण करा. पण लक्षात ठेवा की, प्रत्येक दुर्वा जोडीनेच असावी. असे केल्याने श्रीगणेशाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि कार्यक्षेत्रात प्रभाव आणि वैभव वाढते.