Maharashtra Politics : नागपुरात असे काय घडले की, भाजपयुमो कार्यकर्त्यांनी काँग्रेस आमदाराच्या फलकाला काळे फासले ?

Top Trending News    01-Sep-2025
Total Views |

abhijeet
 
नागपूर : ( Maharashtra Politics ) शहरात गणेशोत्सवाचे भक्तिमय वातावरण आहे, जे बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. चिथावणीखोर कृत्य करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी मागणी संतप्त वंजारी समर्थकांनी लकडगंज पोलिस ठाण्यात केली. कार्यकर्त्यांमध्ये मुकेश गजभिये, आशिष तायवाडे यांचा समावेश होता. त्यांनी सांगितले की गुंडगिरी करणारे काही लोक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. आज जर ६ जिल्ह्यांचे आमदारही सुरक्षित नसतील, तर सामान्य लोकांची काय अवस्था असेल ? रस्त्यांपासून ते दिल्लीपर्यंत सत्तेत असलेले लोक सत्तेच्या नशेत डुंबले आहेत. या लोकांना केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आहे, असा आरोप त्यांनी केला. पोलिसांकडे तक्रार दाखल ( Maharashtra Politics ) करण्यात आली आहे. जर दोषींना अटक झाली नाही तर काँग्रेस कार्यकर्ते त्यांना चोप देतील, असा इशाराही देण्यात आला.
 
पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातील सीए रोड आंबेडकर चौकात असलेल्या नागपूर विभागाच्या पदवीधर मतदारसंघातील काँग्रेस आमदार अभिजीत वंजारी यांच्या जनसंपर्क कार्यालयावर लावलेल्या फलकाला रविवारी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. अॅड. वंजारी यांनी नामफलकावर पुर्व नागपूर आमदार असे लिहिल्याने हा संताप व्यक्त करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, या प्रकारामुळे काँग्रेसजणही संतप्त झाले. त्यांनीही या प्रकाराचा निषेध ( Maharashtra Politics ) केला.
 
अभिजित वंजारी म्हणाले, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत या लोकांचे मन सत्तेने बिघडवले आहे. ते मत्सराने जळत आहेत. कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे आणि दोषींवर त्वरित कारवाई करावी. ते म्हणाले की मी विधिमंडळाचे कोणतेही नियम, कायदे आणि प्रोटोकॉलचे उल्लंघन केलेले नाही. सर्व पक्षांचे विधान परिषदेचे सदस्यही आमदार आहेत. भाजयुमो कार्यकर्त्यांच्या गुंडगिरीच्या निषेधार्थ काँग्रेस १ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता सतरंजीपुरा येथील सुभाष पुतळ्यासमोर आंदोलन करणार आहे. शहराध्यक्ष विकास ठाकरे म्हणाले की, गणेशोत्सवादरम्यान काही गट जाणूनबुजून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा ( Maharashtra Politics ) प्रयत्न करत आहेत.