France On Fire : नेपाळनंतर आता फ्रान्स पेटला ! २०० जण अटकेत, रास्ता रोको आणि जाळपोळ

Top Trending News    10-Sep-2025
Total Views |

France On Fire
 
पॅरिस : ( France On Fire ) नेपाळमधील हिंसाचाराची आग विझली नाही तोच फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्येही आंदोलन पेटले आहे. नेपाळमधील हिंसाचारानंतर फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्येही निदर्शने सुरू झाली आहेत. निदर्शक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून जाळपोळ करत आहेत. फ्रान्समधील परिवहन व्यवस्थाही कोलमडल्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या विरोधात ‘ब्लॉक एव्हरीथिंग’ नावाच्या एका नवीन आंदोलनाने बुधवारी सकाळी देशभरातील महामार्ग रोखले. रस्त्यांवर जाळपोळ, घोषणाबाजी आणि गोंधळ दिसून आला. अनेक बसेसनाही आग लावण्यात आली. पॅरिसमध्ये निदर्शक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. पॅरिसमध्ये सर्वत्र जाळपोळ दिसून येत आहे.
 
फ्रान्समधील मुस्लिम समुदायात सध्या संतापाचे वातावरण आहे. पोलिसांनी २०० ते ३०० निदर्शकांना ताब्यात घेतले आहे. ९ मशिदींबाहेर अज्ञातांनी डुकरांची मुंडकी ठेवली असून यापैकी ५ मशिदींवर निळ्या रंगात फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे नाव लिहिलेले आढळले. सुरक्षा दलांच्या मोठ्या तुकड्या तैनात असूनही, राजधानी पॅरिससह मोठ्या शहरांमध्ये परिस्थिती बिकट झाली आहे. ही बंडखोरी अशा वेळी होत आहे जेव्हा फ्रेंच राजकारण आधीच संकटात आहे. संसदेने अलीकडेच पंतप्रधान फ्रँकोइस बायरो यांना विश्वासदर्शक ठरावात पराभूत केले आणि मॅक्रॉन यांना त्यांच्या कार्यकाळातील पाचवे पंतप्रधान सेबॅस्टियन लेकोर्नू यांची नियुक्ती ( France On Fire ) करावी लागली.
 
फ्रान्सचे गृहमंत्री ब्रुनो रिटेललेऊ यांच्या मते, निदर्शक त्यांच्या हेतूंमध्ये अपयशी ठरले आहेत. हे निदर्शने प्रथम सोशल मीडियावर सुरू झाली, त्यानंतर निदर्शक पॅरिसमध्ये जमले. अशा स्थितीत पॅरिसमध्ये ८० हजारांवर पोलिस तैनात करण्यात आले. बॅरिकेड्‌स तोडणाऱ्या निदर्शकांना पोलिसांनी तात्काळ अटक ( France On Fire ) केली. निदर्शकांनी पॅरिसमधील सर्व काही बंद ठेवण्याची घोषणा केली होती. चेहऱ्यावर मास्क लावून शेकडो लोक रस्त्यावर उतरलेत. आंदोलनकर्त्यांनी फ्रान्समधील रस्ते कचऱ्याचे डब्बे अन् बॅरिगेट्स लावून वाहतूक अडवली. पॅरिसशिवाय बोरदॉ आणि मार्सिले या शहरातही आंदोलक आक्रमक झाले. पोलिसांवर बाटल्या अन् फ्लेयर्स फेकल्या. रेल्वे हब गारे दू नॉर स्टेनशवरही आंदोलन झाले. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी पोलिसांनी अनेकांना बेड्या ठोकल्या आहेत. पुढील काही दिवसांत हा रोष अन् संताप आणखी वाढू शकतो, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.