पितृपक्षाची ( Indira Ekadashi ) सुरुवात झाली असून याकाळात सर्वजण आपल्या पितरांचे पूजन तर्पण आणि श्राद्ध करतात. यामुळे पितरांच्या आत्म्यास शांती मिळते व त्यांची आपल्यावर कृपा राहते असे मानतात. अशातच पितृपक्षात जी एकादशी येते तिला इंदिरा एकादशी म्हणतात. याच एकादशीला पापनाशिनी एकादशी देखील म्हटले जाते. कारण, या एकादशीचे व्रत केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व पाप तर नष्ट होतात शिवाय पितरांच्या आत्म्यास शांती मिळते व भगवान विष्णूची कृपा देखील मिळते, अशी मान्यता आहे. हे व्रत भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला ( Indira Ekadashi ) केले जाते.
शास्त्रानुसार, ज्या दिवशी सकाळी एकादशी तिथी ( Indira Ekadashi ) असते त्या दिवशी उपवास करतात. त्यामुळे १७ तारखेला एकादशीचा उपवास आणि श्राद्ध केले जाईल. इंदिरा एकादशीच्या दिवशी गौरी योग नावाचा शुभ योग आहे. चंद्र स्वतःच्या कर्क राशीत असेल ज्यामुळे गौरी योग तयार होईल. यामुळे उपवास आणि श्राद्ध करणाऱ्यांना पुण्य मिळेल.
इंदिरा एकादशीच्या दिवशी उपवास आणि तर्पण केल्याने पितरांचे पाप नष्ट होतात. इंदिरा एकादशी व्रत केल्याने सुख, समृद्धी, शांती आणि आध्यात्मिक प्रगती मिळते. हे व्रत केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि पितरांना स्वर्गप्राप्ती होते असे मानले जाते. इंदिरा एकादशीचे व्रत मोक्ष देणारे मानले जाते. हे व्रत केल्याने पितरांचा आत्मा तृप्त होतो. आपले पितर हे व्रत केल्याने जीवन-मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती ( Indira Ekadashi ) मिळवतात.
अशी असते पूजेची पद्धत
- सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे परिधान करावेत.
- विष्णू आणि पितरांचे स्मरण करून उपवास सुरू करावा.
- पितृ पक्षात येत असल्याने या दिवशी पितरांसाठी श्राद्ध विधी करावे.
- भगवान विष्णूंची मूर्ती स्थापित करून त्यांची पूजा करावी. मूर्तीला पंचामृत स्नान घालून, नवीन वस्त्र अर्पण करावे आणि तुळशीची पाने व फुले वाहावीत.
- नैवेद्य म्हणून फळे आणि इतर योग्य पदार्थ दाखवावेत.
- दिवसभर उपवास करून संध्याकाळी इंदिरा एकादशीची ( Indira Ekadashi ) कथा ऐकावी.
- गरजू लोकांना अन्न किंवा इतर आवश्यक वस्तूंचे दान करावे.
- दुसऱ्या दिवशी, म्हणजे द्वादशीला, उपवास सोडला जातो. याला 'पारणा' म्हणतात.