बाजारगाव ( Bazargaon Blast ) येथील सोलार एक्सप्लोसिव्ह मध्ये मोठा स्पोर्ट झाल्याची घटना रात्री साडेबाराच्या सुमारास घडली आहे. या घटनेत खूप मोठे नुकसान झाले आहे. 15 जखमींना रात्रीच रुग्णालयात भरती करण्यात आले होते. या स्फोटात झालेला धमाका इतका जोरदार झाला की नागपूर अमरावती महामार्गापर्यंत त्याचा मलबा येऊन पडल्याचे सांगितले जात आहे. तसेच, शेजारी असल्या गावातही या स्फोटाचा आवाज पोहोचला परिणामी गावातील लोक घराबाहेर पडून मदतीसाठी धावू लागले.
माजी मंत्री अनिल देशमुख यांनी देखील घटनास्थळाला भेट दिली त्यांच्या वसंतराव देशमुख प्रतिष्ठानच्या माध्यमातून रात्री सहा जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्रीपासून सुरक्षेच्या कारणावरून कंपनीच्या आत कोणालाही जाण्यास बंदी घालण्यात आली होती. सोलार समोर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. रात्रपाळीतील कामगारांचे नातेवाईक देखील पोहोचले होते. मात्र, काही माहिती मिळत नसल्याने ते हैराण ( Bazargaon Blast ) झाले होते.
प्राप्त माहितीनुसार स्फोटाच्या अगोदर आग लागली असल्याने काहींना तत्काळ प्लांट मधून बाहेर पडले ते सुरक्षित राहिले. जखमींमध्ये कैलास वर्मा, मनीष वर्मा, सनी कुमार, अरुण कुमार, अतुल मडावी, सौरभ डोंगरे, तेजस बांधते, सुरज गुडके, अखिल बावणे, धर्मापाल मनोहर यांचा समावेश आहे. मयूर गणवीर हा चंद्रपूरचा राहणारा व्यक्ती सोलार कंपनीच्या परिसरात असलेल्या इमारतीत होता. स्फोटामुळे उडालेल्या सराखी शरीरात घुसून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते आहे. या सोलर एक्सप्लोसिव्हच्या टी १५ प्लांटमध्ये मोठा स्फोट झाल्याची नोंद आहे. हा प्लांट नागपूर-अमरावती महामार्गाजवळ ( Bazargaon Blast ) होता आणि स्फोटानंतर महामार्गावर ढिगारा पडला.
अनेक कामगार जखमी
डझनभर जखमी कामगारांना रुग्णवाहिकेतून नागपूरला आणले जात आहे. बाजारगावच्या सोलर कंपनीत मोठा स्फोट झाला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख घटना स्थळाकडे रवाना अनिल देशमुख यांच्या वसंतराव देशमुख प्रतिष्ठाणच्या गाडीने ६ जखमींना नागपूरकडे रवाना केले आहे. मेडीकल मध्ये नेण्यात येणार आहे. सिव्ही युनिट मध्ये स्फोट झाला आहे. जखमी सर्व घटना स्थळाच्या बाजुलाच २०० मीटरवर असलेल्या लॅब मध्ये काम करत होते. घटना स्थळी किती कामगार होते त्याची मिळाली नक्की नाही. सर्व जखमींना दंदे हॅास्पीटल मध्ये नेण्यात येणार आहे. सुरक्षेच्या कारणावरुन कंपनीच्या आत कोणालाही जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. सोलारसमोर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. रात्रपाळीतील कामगारांचे नातेवाईक ( Bazargaon Blast ) पोहोचले. मात्र, काही माहिती मिळत नसल्याने लोक हैराण आहे.
कंपनीच्या दोन ऍम्ब्युलन्सने ( Bazargaon Blast ) इतर जखमींना नागपूर करीता रवाना केले आहे. जखमी आकडा 15 च्या आसपास असल्याची भिती स्पॉटवर असलेल्यांचा अंदाज वर्तविला जात होता. सोलर एक्सप्लोसिव ही खाजगी क्षेत्रातील स्फोट निर्माण करणारी सर्वात मोठी कंपनी आहे. स्फोटात जखमींची संख्या 10 असून कैलास वर्मा, मनीष वर्मा, सनी कुमार, अरुण कुमार, अतुल मडावी,सौरभ डोंगरे, तेजस बांधते, सुरज गुटके, अखिल बावणे, धर्मपाल मनोहर, हे सर्व जखमी नावे आहे. स्फोटाआधी फायर झाल्याने कामगारांना प्लांटच्या बाहेर पडण्यास वेळ मिळाला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला, मात्र उडालेल्या मलब्याने दोन कामगार गंभीर जखमी झाले. १ मृतदेह सापडला आहे. ४ जण आयसीयूमध्ये आहेत आणि ९ जण किरकोळ जखमी आहेत.
सौर परिस्थिती :
१. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु, त्याची पडताळणी केली जात आहे.
२. बाजारगाव संकुलात सुमारे ३० मिनिटांपूर्वी स्फोट झाला.
३. परिस्थिती हाताळण्यासाठी पुरेसे सैन्य तैनात करण्यात आले आहे.
४. मी आणि इतर वरिष्ठ अधिकारी मार्गावर आहोत.