Fire Disaster Gondpipri : उंदराच्या खोड्याने पेटली आग ! लाखोंचं नुकसान

Top Trending News    05-Sep-2025
Total Views |

Fire Disaster Gondpipri
 
गोंडपिपरी : ( Fire Disaster Gondpipri ) उमेश जानकिराम मोहुर्ले (रा. भंगाराम तळोधी, ता. गोंडपिंपरी) यांच्या घरी देवासमोर दिवा लावला आणि ते गणेश मंडळाकडे गेले. एवढ्यातच उंदराने आपला कारनामा केला. पाहता-पाहताच आगीने रुद्ररूप धारण केले. त्यामुळे टीव्ही, टेबल, फॅन, लाकडी बेड, 55 हजार रुपये रोख, 16 ग्रॅम सोने, कपडे व दैनंदिन वापरातील जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्य आगीत जळून भस्मसात झाले. त्यानंतर ग्रामपंचायतचे सदस्य जयेश कारपेनवार यांनी सदर घटनेची माहिती ठाणेदार रमेश हत्तीगोटे, तहसीलदार शुभम बहाकर यांना दिली. ही घटना बुधवारी (दि. ३) रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. या दरम्यान लाईनमनच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, घरातील साहित्य जळून खाक ( Fire Disaster Gondpipri ) झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.
 
मोहुर्ले यांच्या घरातील देवघरात लावलेल्या दिव्याची वात थेट उंदराने पळवली ( Fire Disaster Gondpipri ) अन‌् क्षणात त्यामुळे घराला आग लागली. या दरम्यान घटनास्थळी पोलिस कर्मचारी कृष्णा रॉय, अनुप निकोरे दाखल झाले. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तालुका प्रशासनाने अग्निशामक दलाचे वाहन पाठविले, मात्र तालुक्यात मोठ्या प्रमाणात २ दिवसांपूर्वी पाऊस झाल्याने जागोजागी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले. अशातच आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाठवलेले वाहन चिखलात फसले. त्यामुळे पोंभुर्णा नगरपंचायतचे वाहन बोलवण्यात आले. मात्र ते वाहन रात्री उशिरा १०.३० वाजता पोहोचले. या दरम्यान वाहन घटनास्थळी पोहोचेपर्यंत गावकऱ्यांनाच आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले होते.घरात आगीचा भडका उडाल्यानंतर सिलिडरचा स्फोट होऊ नये, यासाठी लाइनमन सचिन पिंपळशेंडे यांनी जीव धोक्यात घालून सिलिंडर बाहेर काढले. त्यामुळे स्फोट होता-होता वाचला ( Fire Disaster Gondpipri ) तसेच होणारी मोठी दुर्घटना टळली.