Nepal Riots : नेपाळ का पेटले ? चार वर्षांत चार देशांत जनतेचा ज्वालामुखी

Top Trending News    09-Sep-2025
Total Views |

 Nepal Riots
 
दिल्ली : ( Nepal Riots ) भारताचे शेजारील देश गेल्या चार वर्षांपासून अस्थिर आहेत. प्रथम अफगाणिस्तान, श्रीलंका, नंतर बांगलादेश आणि आता नेपाळमध्ये सत्ता परिवर्तनासाठी निदर्शने झाली आहेत. बांगलादेशात गेल्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये विद्यार्थी चळवळीमुळे शेख हसीनाचे सरकार पडले. २००९ पासून शेख हसीनांचे अवामी लीग सरकार सत्तेत होते. परंतु भ्रष्टाचार, मानवी हक्कांचे उल्लंघन आणि आरक्षण धोरणावरील असंतोषामुळे विद्यार्थ्यांचा रोष उफाळून आला आणि त्यांचे रूपांतर आंदोलनात झाले. पुढे जुलै-ऑगस्टमध्ये निदर्शने अधिक हिंसक झाली आणि सरकारने गोळीबाराचे आदेश दिले. या गोळीबारात ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.
 
मालदीवमध्येही नोव्हेंबर २०२३ मध्ये मोहम्मद मुइझ्झू यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्यानंतर राजकीय वातावरण बदलले आहे. त्यांनी 'भारतविरोधी' भूमिकेसह राष्ट्रवादी आश्वासनांवर प्रचार केला आणि माजी राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांना बाजूला केले. तर श्रीलंकेचा विचार करता २०२२ मध्ये श्रीलंकेत आर्थिक संकट निर्माण झाले. ब्रेड आणि रोटीसारख्या दैनंदिन वस्तूंच्या किंमती गगनाला भिडू लागल्या. याविरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू झाली. रस्त्यांवर जाळपोळ, राष्ट्रपती निवासस्थान, संसद, सर्व ठिकाणी निदर्शकांनी कब्जा केला. मे २०२२ मध्ये पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर ९ जुलै २०२२ रोजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे मालदीवला ( Nepal Riots ) पळून गेले.
 
पाकिस्तानातही राजकीय अस्थिरता कायम ( Nepal Riots ) आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अविश्वास प्रस्तावाद्वारे सत्तेवरून काढून टाकल्यानंतर सुरू झालेले आंदोलन अजूनही सुरू आहे. टीटीपीसारख्या गटांनी वायव्य पाकिस्तान आणि बलुचिस्तानमध्ये हल्ले तीव्र केले आहेत. २०२१ मध्ये अफगाणिस्तानातही नेपाळसारखी परिस्थिती निर्माण झाली, जेव्हा तालिबानने काबूलमध्ये सत्ता काबीज केली. अफगाणिस्तानात अमेरिकेचे पाठबळ असलेले सरकार कोसळले आणि तालिबान राजवट स्थापन झाली. २००१ मध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखाली तालिबानला सत्तेवरून हटविण्यात आले आणि अशरफ घनी यांचे सरकार स्थापन झाले. परंतु २० वर्षांच्या संघर्षानंतर २०२० मध्ये अमेरिका-तालिबान करारानुसार परदेशी सैन्य माघारीचा निर्णय घेण्यात आला. दुसरीकडे, तालिबानने आपली लष्करी ताकद वाढवली आणि ऑगस्ट २०२१ मध्ये अफगाणिस्तान ताब्यात घेतला. तत्कालीन राष्ट्रपती अशरफ घनी आपला जीव वाचविण्यासाठी देश सोडून पळून गेले. अफगाणिस्तानमधील ( Nepal Riots ) सैन्याची कमकुवतपणा, भ्रष्टाचार, अमेरिकन सैन्याची माघार हे बंडाचे कारण बनले.