नागपूर : ( Fadnavis Vision ) भारतीय माणूस मग तो काश्मीरचा असो वा कन्याकुमारीपर्यंतचा मुंबईला विशेष महत्त्व देतो. त्याचे कारण म्हणजे मुंबईने देशाचा आर्थिक कणा कधीही मोडू दिला नाही. या शहराने उत्तुंग भरारी घेत भारतीय अर्थशक्तीला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. मात्र या मुंबईने सोसले देखील खुप, कधीकाळी रखडलेले प्रकल्प, वाहतूक कोंडी सारख्या समस्या आणि पायाभूम व्यवस्थेवरील ताण हीच मुंबईची ओळख बनली होती. मात्र, राज्याला देवेंद्र फडणवीस ( Fadnavis Vision ) यांच्यासारखे नेतृत्व लाभले आणि मुंबईच्या विकासाला खरी चालना मिळाली. पाहता पाहता बंद पडलेले प्रकल्प पूर्ण होऊ लागले. नाले सफाईचा मुद्दा मार्गी लागला. मुंबई स्वच्छ आणि सुंदर होऊ लागल्याने जागतिक पटलावरच्या नजरा मुंबईकडे वळू लागल्या.
मुंबईत 'कनेक्टिव्हिटी'चे आव्हान
मुंबईचा श्वास येथील वाहतूक व्यवस्था आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेवर आल्यापासून 'इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम'वर भर दिला. त्यांच्या कार्यकाळात केवळ कागदावर असलेले प्रकल्प प्रत्यक्षात जमिनीवर आले आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात आले.
१. अटल सेतू (एमटीएचएल) : विकासाचा सागरी महामार्ग
मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा 'अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू' या प्रकल्पाला केवळ एक पूल म्हणून बघता येणार नाही. तो राज्याच्या प्रगतीचा राजमार्ग ठरतो आहे. २१.८ किलोमीटर लांबीचा हा देशातील सर्वात लांब सागरी सेतू दक्षिण मुंबईला नवी मुंबई आणि तिथून पुढे पुणे-गोवा महामार्गाला जोडतो. फडणवीस ( Fadnavis Vision ) यांच्या कार्यकाळात या प्रकल्पाला मिळालेली तांत्रिक गती आणि निधीची तरतूद यामुळे हा प्रकल्प मुंबईच्या विकासाचा खरा चेहरा बनला आहे.
२. मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीची ओळख कोस्टल रोड :
दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या संपविण्याच्या उद्देशाने उचलण्यात आलेले पाऊल म्हणजे नरिमन पॉइंट ते कांदिवली असा विनाअडथळा प्रवास करण्यासाठी उभारण्यात आलेला 'कोस्टल रोड' प्रकल्प. या प्रकल्पाने पर्यावरणीय आव्हाने आणि तांत्रिक अडचणींवर मात केली आणि अल्प वेळेत मुंबईकरांचा प्रवास सुसह्य केला. सामान्या इंधनाची बचत होऊ लागलीच पण प्रदूषणात घटही झाली.
३. मुंबईत मेट्रोचे जाळे
गेली अनेक दशके मुंबई धावली ती लोकलच्या माध्यमातून. पण याच लोकलला पर्याय निर्माण झाला तो मुख्यमंत्री फडणवीस ( Fadnavis Vision ) यांच्या मेट्रो-३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) या भूमिगत प्रकल्पामुळे. मेट्रोपासून ते मेट्रो-२ए आणि मेट्रो-७ या मार्गांपर्यंत, मुंबईच्या उपनगरांना जोडण्यासाठी मेट्रोचे जाळे अत्यंत वेगाने विस्तारले गेले. आज लाखो मुंबईकर या मेट्रो सेवेचा लाभ घेत आहेत. अर्थातच यामुळे लोकल ट्रेनवरील ताण कमी होण्यास मदत होऊ लागली आहे.
आर्थिक क्रांतीतून जागतिक दर्जाचे नियोजन
मुंबईत केवळ रस्त्यांचा विकास महत्त्वाचा नव्हता तर आर्थिक विकालाची गती वाढविणे अत्यावश्यक होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Fadnavis Vision ) यांनी ही गरज ओळखली आणि मुंबईला 'ग्लोबल फायनान्शिअल हब' बनवण्यासाठी दूरगामी पावले उचलली. आज त्याचे फायदे दिसू लागले आहेत.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
वाढत्या हवाई वाहतुकीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी फडणवीस यांनी घेतलेले निर्णय मोलाचे ठरले. मुंबईत शहरातील हवाई वाहतुकीवरचा ताण कमी झाला. नवी मुंबई विमानतळ प्रकल्प हा फडणवीसांच्या ( Fadnavis Vision ) 'व्हिजन'चा एक महत्त्वाचा भाग आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबई आणि रायगड परिसराचा विकास झाला. तिथे रोजगाराच्या लाखो संधी निर्माण झाल्या.
डिजिटल पायाभूत सुविधा
मुंबईला आशिया खंडातील सर्वात मोठे 'डेटा सेंटर हब' बनवण्यासाठी फडणवीस सरकारने विशेष सवलती देऊ केल्या. धोरणे राबवली. यामुळे जगातील मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांनी मुंबईत कार्यालये स्थापन केली. सर्व्हर्स बसविले. ज्यामुळे मुंबईची ओळख आता 'फिनटेक सिटी' म्हणून होऊ लागली आहे. विकासाचे लाभ केवळ श्रीमंतांपर्यंत मर्यादित न राहता ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत, हा फडणवीसांच्या ( Fadnavis Vision ) धोरणांचा गाभा राहिला आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्प
जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचा कायापालट करण्याचे स्वप्न फडणवीसांनी पाहिले आणि त्याला मुहूर्तरूप दिले. या पुनर्विकास प्रकल्पामुळे धारावीकरांना स्वमालकीचे घर आणि रोजगार मिळणार आहे. तसेच बीडीडी चाळींचा पुनर्विकास करून मध्यमवर्गीय मुंबईकरांना न्याय देण्याचे काम नेतृत्वाखाली केले जाईल.
वॉटर टॅक्सी आणि जलवाहतूक
मुंबईचा विस्तीर्ण समुद्रकिनारा असूनही जलवाहतुकीचा वापर अल्प होता. फडणवीस यांनी वॉटर टॅक्सी आणि रो-रो फेरी सेवा सुरू करून मुंबई-नवी मुंबई आणि अलिबाग दरम्यानचा प्रवास सुलभ केला.
प्रशासकीय पारदर्शकता आणि 'वॉर रूम' संकल्पना
प्रकल्पांची केवळ घोषणा न करता ते पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय ताकद ठेवणे फडणवीसांच्या ( Fadnavis Vision ) रक्तातील गुण आहे. मंत्रालयात 'मुख्यमंत्री वॉर रूम' (CM War Room) उभारून तेथून मुंबईवर नजर ठेवण्याच्या प्रयत्नातून तो गुण अनेकदा स्पष्ट दिसून आला आहे. मोठ्या प्रकल्पांमधील अडथळे, पर्यावरण परवानग्या आणि जमीन संपादनाचे प्रश्न एकाच टेबलावर सोडवले गेले. यामुळे प्रकल्पांचा खर्च वाढण्यापासून वाचला आणि ते वेळेत पूर्ण झाले. केवळ काँक्रीटचे जंगल न उभारता, मुंबई शाश्वत (Sustainable) शहर म्हणून उदयाला येऊ लागली. 'इलेक्ट्रिक बसेस'चा ताफा वाढविण्यावर, किनारपट्टीचे रक्षण करण्याकडे आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे मोठे प्रकल्प (STP) उभारून समुद्राचे प्रदूषण कमी करण्याकडे फडणवीस सरकारने कायम लक्ष दिले.
मुंबईची वाढती लोकसंख्या आणि मर्यादित जमीन हे सर्वात मोठे आव्हान होते. यावर उपाय म्हणून 'व्हर्टिकल डेव्हलपमेंट' आणि 'ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट' यांसारख्या आधुनिक संकल्पना फडणवीसांनी अमलात आणल्या. यामुळे रेल्वे आणि मेट्रो स्थानकांच्या आसपास सोयीसुविधांचे जाळे निर्माण झाले. मुंबई ही शहर नाही, तर ती भारतासाठी ऊर्जेचे केंद्र आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही वर्षांत पेरले ते आज मुंबईकरांना मिळू लागले आहे. अटल सेतूवरून धावणारी वाहने असोत, मेट्रोमधील सुरक्षित प्रवास किंवा कोस्टल रोडवरील निसर्गरम्य दृश्य, या प्रत्येक कामात फडणवीसांची दूरदृष्टी दिसून येते.
जगातील सर्वोत्तम पाच महानगरांपैकी एक
येणाऱ्या काळात मुंबई ही जगातील सर्वोत्तम पाच महानगरांपैकी एक म्हणून गणली जाईल, यात शंका नाही. विकासाचा हा 'मुंबई पॅटर्न' आज इतर राज्यांसाठीही अभ्यासाचा विषय ठरला आहे. "मुंबईकरांचे जीवन सुसह्य करणे आणि शहराला जागतिक स्पर्धेत टिकवून ठेवणे" या ध्येयाने प्रेरित होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Fadnavis Vision ) यांनी मुंबईच्या नवनिर्माणाचा जो पाया रचला आहे, तो येणाऱ्या पिढ्यांसाठी एक अनमोल ठेवा ठरेल. आजची मुंबई ही आधुनिक, वेगवान आणि सर्वसमावेशक आहे. या परिवर्तनाचे खरे शिल्पकार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुंबईच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले आहे अशी भावना मुंबईतील नागरिक आवर्जून व्यक्त करतात.