Ajit Dada : अजितदादांचे अकाली जाणे : राजकारण हादरवणारा अनपेक्षित धक्का !

Top Trending News    28-Jan-2026
Total Views |

ajit
 
मुंबई : ( Ajit Dada ) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती मध्ये विमान अपघातात मृत्यू झाला. हे विमान सकाळी मुंबई कडून बारामती येथे येत होते हा प्रवास साधारणपणे 40 मिनिटांचा होता सुमारे नऊ वाजून बारा मिनिटांनी विमान लाइन करत असताना कोसळल्याची माहिती प्राप्त झाली. डीजीसीएने याबाबत अधिकृतपणे विमानात बसलेल्या सहा लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात अजित पवार ( Ajit Dada ) यांचाही समावेश आहे.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Dada ) हे जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या सभेसाठी बारामतीत पोहोचणार होते सभा झाल्यानंतर त्यांचे बारामतीतून मुंबईत जाण्याचे नियोजनही होते. वैमानिक मदन साहिल आणि कॅप्टन यश हे विमानाचे नेतृत्व करीत होते. अजित पवार यांच्या समावेत त्यांचे सुरक्षा रक्षक ही होते. अपघातात सहाही जणांचा मृत्यू झाल्याचे डीजीसीएने सांगितले.
 
या घटनेनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दुःखद भावना व्यक्त केल्या, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार जी ( Ajit Dada ) यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक, दुर्दैवी आणि दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. गेली अनेक वर्षं राज्याच्या विधिमंडळात सोबत काम करताना अजितदादांशी अतिशय जवळचा संबंध राहिला आहे. त्यांचे प्रशासनिक कौशल्य, विकासात्मक दृष्टिकोन आणि लोकांना जोडण्याची हातोटी यांमुळे अजितदादांचे ( Ajit Dada ) कायमच महाराष्ट्राच्या राजकारणात एक अढळ स्थान राहिले आहे. महाराष्ट्राच्या विकासाची आकांक्षा असलेल्या या लोकनेत्याचे अकाली निधन होणे, ही केवळ महाराष्ट्राचीच नव्हे, तर संपूर्ण देशाची कधीही भरून न निघणारी हानी आहे. या दुःखद प्रसंगी संपूर्ण पवार कुटुंबीयांसोबत माझ्या संवेदना आहेत. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती प्रदान करो असे गडकरी म्हणाले.