Black Box : उपमुख्यमंत्री अजितदादांच्या मृत्यूमागचं सत्य सांगणारा साक्षीदार !

Top Trending News    28-Jan-2026
Total Views |

black box
 
मुंबई : ( Black Box ) विमान अपघात नेमकी कसा झाला हे जाणून घेण्यासाठी विमानामध्ये एक महत्त्वाचे तंत्र लागलेले असते त्याला ब्लॅक बॉक्स म्हणतात ब्लॅक बॉक्स काम असतं विमानाच्या अपघाताची खरी कारणे शोधणे. एकाप्रमाणे विचार करायचे झाल्यास तो अपघाताचा मूक साक्षीदार देखील असतो. बुधवारी सकाळी 9:12 मिनिटांनी अजित पवार यांचे विमान बारामती येथे कोसळले त्यात त्यांचा अपघाती मृत्यू झाला हा अपघात नेमकी कसा झाला याची तंतोतंत माहिती विमानातील ब्लॅक बॉक्स ( Black Box ) मधून मिळणार आहे.
 
ब्लॅक बॉक्स ( Black Box ) हा दोन उपकरणांचा संच असतो. ज्यामध्ये flight data recorder आणि cockpit voice recorder यांचा समावेश असतो. Flight data recorder मध्ये विमानाच्या तांत्रिक माहितीची नोंद असते. तर cockpit voice recorder मध्ये कॉकटेल मधील संवाद आणि आवाजाची नोंद असते. या दोन संचांमधून विमानाचा वेग, उंची, दिशा, ब्रेक, इंजिनची परिस्थिती, ऑटोपायलट अशा सगळ्या तंत्रज्ञानाची माहिती मिळते. याच तंत्रज्ञानातून पायलटची चूक, हवामान किंवा त्या वेळची बाह्य स्थिती स्पष्ट होते.
 
कॉपीट व्हॉइस रेकॉर्डर मुळे अलार्म इशारे आणि तणावाचे क्षण समजतात यामुळे निर्णय प्रक्रिया कुठे चुकली का या संदर्भात समजते. पायलट आणि को पायलट यांच्यामध्ये झालेला संवाद यासाठी आधार समजला जातो. हा अपघात तांत्रिक अडचणीमुळे झाला की मानवी चुकीमुळे झाला हे ब्लॅक बॉक्सच्या अहवालावरून स्पष्ट होते. महत्त्वाचे म्हणजे 1100°c पेक्षा जास्ती तापमान सहन करण्याची ब्लॅक बॉक्सची ( Black Box ) ताकद असते त्यामुळे अपघाताचे कारण शोधण्यात हा मुख साक्षीदार ठरू शकतो. विमान कंपनी विमानातील ब्लॅक बॉक्स लवकरच ताब्यात घेईल. त्यानंतर जो अहवाल सादर करेल त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अपघाताचे खरे कारण समजू शकेल.