Marathi History : हरवलेलं सुवर्णयुग उघड : शालिवाहनामुळे मराठी वर्षात ७८ वर्षांचा फरक का ?

Top Trending News    19-Mar-2026
Total Views |

marathi 
शालिवाहन ( Marathi History ) कोण होता ? आपण मराठी लोक त्याच्या नावाने कालगणना का करतो ? २ हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात असे काय झाले की त्यामुळे मराठी वर्षाला सुरुवात झाली ? असे प्रश्न कदाचित आपल्याला पडलेही नसतील. याचीच खंत इतिहासकार व्यक्त करतात. कारण महाराष्ट्राच्या या सुवर्णयुगाबद्दल आजही अनेकांना माहिती नाही.
 
शक संवताचा ( Marathi History ) आरंभ ३ मार्च ७८ रोजी झाला. सम्राट कनिष्काने हे संवत सुरू केले. या दिवशी तो सिंहासनारूढ झाला. कनिष्क हा कुषाण राजा होता. त्याने शकांवर दीर्घकाळ राज्य केले. त्याच्या मृत्यूनंतर हे शक संवत म्हणून प्रसिद्ध झाले. कारण, कनिष्कानंतर शकांनी बराच काळ सत्ता गाजवली. त्यांनीही हेच संवत शक संवत म्हणून वापरले. त्यामुळे कनिष्क संवतलाच शक संवत म्हटले जाऊ लागले. शालिवाहन राजाने शकांवर विजय मिळविला. तेव्हापासून शालिवाहन शकाची सुरुवात झाली. शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने तेव्हाचे त्यांचे प्रतिस्पर्धी शकांचा पराभव केला तोही याच दिवशी. त्याने ६ हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले आणि त्यांत प्राण फुंकून हा विजय मिळवला, अशी आख्यायिका आहे. शब्दशः अर्थ न घेता, कदाचित त्या काळातील मृतवत, थंड गोळ्याप्रमाणे पडलेल्या समाजातील युवकांना त्याने जागृत करून हा विजय मिळवला ( Marathi History ) असे म्हणता येईल. याच शालिवाहन राजाच्या नावावरून शालिवाहन शके ही त्या काळात नवी कालगणना अस्तित्वात आली.
 
ठिकाण नाशिक. वर्ष इसवी सन ७८. मध्य आशियातील शकांनी हल्ला चढवला. त्यांना परतवून लावण्याचे आव्हान होते पैठणच्या गौतमीपुत्रासमोर. त्याने ते लीलया पेलले. तेव्हापासूनच महाराष्ट्रात गौतमीपुत्राच्या शालिवाहन या कुळाच्या नावाने कालगणना सुरू झाली. शालिवाहन कुळातला गौतमीपुत्र सातकर्णी हा सर्वांत पराक्रमी राजा. प्रतिष्ठान म्हणजेच आताचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण ही त्याची राजधानी. आताचा महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि मध्य प्रदेश एवढे त्याचे विस्तीर्ण साम्राज्य होते. राजकीय स्थैर्यामुळे व्यापार थेट युरोपापर्यंत पोहोचला होता. महाराष्ट्रातील कापड आणि वस्तूंना रोममध्ये मागणी होती. सुमारे ४५० लेण्यांची निर्मिती सुरू होती. पैठणमध्ये सापडलेल्या या नाण्यांवरूनच तेव्हाच्या सुबत्तेची कल्पना ( Marathi History ) येते.
शालिवाहन हे महाराष्ट्राच्या ( Marathi History ) सलग इतिहासातले पहिले पराक्रमी घराणे. तसेच गौतमीपुत्र या शालिवाहन राजाने संस्कृतपेक्षा प्राकृत म्हणजेच तेव्हाच्या मराठीच्या रुपाला प्रथम चालना आणि राजाश्रय दिला. पैठण आणि संभाजीनगरच्या संग्रहालयात गौतमीपुत्रासह इतर शालिवाहन राजांच्या काळातल्या वस्तू ठेवलेल्या आहेत. हिंदू नववर्षाची आणि मराठी नववर्षाची सुरवात म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. या पाडव्याच्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली. विक्रम संवत आणि शालिवाहन शक एकाच दिवशी सुरू झाले. मराठी नववर्षाचा प्रारंभ हाच दिवस मानला जातो. प्रत्येक युगात ग्रहांची हालचाल बदलत असते, त्यामुळे ऋतूही मागे-पुढे जातात. या कारणास्तव, अचूक वेळ मोजण्यासाठी गणिताची पद्धत बदलत राहिली आहे.
 
सूर्य, चंद्र, पृथ्वीवरून गणना
 
वेळेची गणना करण्यासाठी, सूर्य, चंद्र आणि पृथ्वीच्या हालचाली समजून घेणे फार महत्वाचे आहे. पृथ्वीवरील ऋतू आणि दिवस बदलण्यासाठी सूर्य आणि चंद्र जबाबदार आहेत. पृथ्वी चंद्रासोबत सूर्याभोवती फिरते. या कारणास्तव, तिन्हींच्या हालचाली समजून घेऊनच अचूक वेळेची गणना केली जाऊ शकते. यासाठी ज्योतिषाच्या पुस्तकांमध्ये अनेक सूत्रे आणि तत्त्वे दिली आहेत. त्यावरून ही गणना केली जाते.
 
प्रत्येक युगात राजाचे कॅलेंडर
 
नवीन युग सुरू होणार आहे असा संदेश प्रजेला जावा म्हणून राजा नवीन संवत चालवत असे. प्रत्येक राजा नवीन संवत चालवू शकतो असे नाही, अनेक राजे त्यांच्या काळात जुन्या हिशोबालाच मान्यता देत असत. परंपरा व धर्मग्रंथानुसार, नवीन संवत सुरू होण्यापूर्वी, राजाला त्याच्या राज्यातील सर्व लोकांचे कर्ज फेडावे लागे. त्यानंतरच ( Marathi History ) नवीन संवत सुरू होऊ शकत असे.
 
गुढीपाडवा समस्त हिंदू नववर्ष
 
भारतीय कालगणनेनुसार कल्प, मन्वंतर आणि युगानंतर संवत्सराचे नाव येते. नवीन संवत चालविण्याचे शास्त्रीय विधी आहेत. शासकाला आपल्या महान कर्म किंवा विजयाच्या स्मृतीप्रीत्यर्थ आपले संवत प्रारंभ करावयाचे असेल, तर त्याच्या पूर्वी आपल्या राज्याच्या संपूर्ण प्रजेचे ऋण त्याने अदा केले पाहिजे. भारताचे सर्वमान्य विक्रम संवत हे एकमेव राष्ट्रीय संवत आहे. कारण सम्राट विक्रमादित्याने शास्त्रीय विधीचे पालन करून सवंत आरंभ केले होते. तथापि, विक्रम संवतच्या उत्पत्तीविषयी इतिहासकारांत एकमत नाही, शकांचा एक राजा ओझोझ पहिला याने इसवी सनापूर्वी ५७ व्या वर्षी त्याचा म्हणून एक संवत सुरु केला. त्यालाच पुढे गुप्तवंशीय सम्राट विक्रमादित्य याने शक कुशाणांचा उच्छेद केला तेव्हापासून लोक विक्रम संवत म्हणून म्हणू लागले. विक्रम संवत आणि शालिवाहन संवत या दोन्ही राष्ट्रीय संवताचा ( Marathi History ) संबंध भारतीयांनी शक-कुशाणांवर जे विजय मिळवले त्यांच्याच स्मृतिगौरवाशी आहे.
 
गुढीपाडवा हे नुसते मराठी नववर्ष ( Marathi History ) नसून, समस्त हिंदू नववर्ष आहे. विक्रम संवतची दिवाळीतल्या पाडव्याच्या दिवशी सुरुवात होते. विक्रम संवत्सर चैत्र कृष्ण प्रतिपदेला सुरू होतो. हा कृष्णपक्ष शुक्लपक्षाच्या आधी येतो. गुजरात आणि महाराष्ट्रात नव्या विक्रम संवत्सराची सुरुवात कार्तिक शुद्ध प्रतिपदेला म्हणजे दिवाळीतल्या पाडव्याच्या दिवशी होते. विक्रम संवत्सर हे ग्रेगरियन म्हणजे इंग्रजी सनाच्या आकड्यापेक्षा ५६ने अधिक असते. म्हणजेच इ.स. २०२६ हे विक्रम संवत २०८२ असेल.
 
महाभारतकालीन कॅलेंडर
 
युधिष्ठिर काळाचे ४ प्रकारचे पंचांग मानले जातात. महाभारताचा काळ ५ हजार वर्षे जुना मानला जातो. या काळात ४ संवत्सर सुरू झाले.
- युधिष्ठिर संवत:
युधिष्ठिर इसवी सन ३१३९ मध्ये राजा झाला त्या दिवसापासून हे संवत सुरू झाले. ज्याची सुरुवात माघ महिन्यापासून होते.
- काली संवत:
श्रीकृष्णाच्या मृत्यूनंतर चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून काली संवत सुरू झाले.
- जय संवत:
श्रीकृष्णाच्या मृत्यूच्या ६ महिन्यांनंतर, जेव्हा बृहस्पतिने राशी बदलली तेव्हा जय संवत्सर सुरू झाले. त्याची सुरुवात कोणी केली याचा उल्लेख नाही.
- सप्तर्षी संवत:
श्रीकृष्णाच्या मृत्यूनंतर २५ वर्षांनी उत्तराखंडमध्ये युधिष्ठिराचा मृत्यू झाला. त्यावेळी सप्तर्षी नावाचा संवत्सर सुरू झाले.
संवत्सरांची नावे
 
काही विशिष्ट घटनांची ( Marathi History ) त्या त्या वर्षातील नोंद घेऊन ही नावे तयार केली असावीत. (भृगू संहिता - जातक खंड). हा काल दोन-अडीच हजार वर्षांचा असावा. खाली दिलेली नावे 'चांद्र संवत्सरांची' आहेत. ही ६० संवत्सरे असून, ही वर्षे संपली की (म्हणजे शेवटच्या 'क्षय संवत्सर'नंतर ) पुन्हा प्रभव या नावाचे नवे संवत्सर सुरू होते. विक्रम संवत्सरांचीही हीच नावे आहेत, परंतु त्यांचा सन मात्र वेगळा असतो.
 
१. प्रभव, २. विभव, ३. शुक्ल, ४. प्रमोद, ५. प्रजापति, ६. अंगिरस, ७. श्रीमुख, ८. भाव, ९. युव, १०. धाता, ११. ईश्वर, १२. बहुधान्य, १३. प्रमाथी, १४. विक्रम, १५. वृषप्रजा, १६. चित्रभानु, १७. सुभानु, १८. तारण, १९. पार्थिव, २०.अव्यय, २१. सर्वजीत, २२. सर्वधारी, २३. विरोधी, २४. विकृति, २५. खर, २६. नंदन, २७. विजय, २८. जय, २९. मन्मथ, ३१. दुर्मुख ३१. हेमलंबि ३२. विलंबि, ३३. विकारी, ३४. शार्वरी, ३५. प्लव, ३६. शुभकृत, ३७. शोभकृत ३८. क्रोधी, ३९. विश्वावसु, ४०. पराभव, ४१. प्लवंग, ४२. कीलक, ४३. सौम्य, ४४. साधारण, ४५. विरोधकृत, ४६. परिधावी, ४७. प्रमादी, ४८. आनंद, ४९. राक्षस, ५०. आनल, ५१. पिंगल, ५२. कालयुक्त, ५३. सिद्धार्थी, ५४. रौद्र, ५५. दुर्मति, ५६. दुन्दुभी, ५७. रूधिरोद्गारी, ५८. रक्ताक्षी, ५९. क्रोधन, ६०. अक्षय
 
शालिवाहन - विक्रम आणि अन्य संवत्सरे
 
- शालिवाहन शक संवत :
इसवी सनाच्या आकड्यामधून ७८ किंवा ७७ वजा केले की शालिवाहन शकाचा आकडा मिळतो.
 
- विक्रम संवत :
विक्रम संवत्सराचे नववर्ष दिवाळी पाडव्याच्या दिवशी (बलिप्रतिपदा) सुरू होतो. इसवीसनाच्या आकड्यात ५६ किंवा ५७ मिळविले की विक्रम संवताचा आकडा येतो. विक्रम वजा १३५ = शक संवत.
 
- युधिष्ठिर संवत :
कलियुग संवताचे पर्यायी नाव. (अन्य मतानुसार, कलियुगाच्या प्रारंभानंतर ३०४४ वर्षांनी युधिष्ठिर शकाची सुरुवात झाली.).
 
- राज्याभिषेक संवत :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर सुरू झालेला संवत. इसवी सन १६७४ सालच्या जून महिन्यात याचा प्रारंभ झाला.
 
- चालुक्य विक्रम संवत :
आंध्र प्रदेशातील कल्याणपूरचा चालुक्य सोळंकी राजा ६वा विक्रमादित्य याने हा संवत सुरू केला. या संवताला चालुक्य विक्रमकाल, चालुक्य विक्रम वर्ष किंवा वीर विक्रम काल अशीही नावे आहेत. या संवताच्या अंकात १०७६ मिळवले की इसवी सन येतो.
 
- कलचुरी संवत :
चेदी संवत किंवा त्रैकूटक संवत असेही यास म्हणतात. गुजरातमधील, कोकणातील आणि मध्य प्रदेशातील शिलालेखांत हा संवत वापरलेला असतो. कलचुरी संवताच्या आकड्यामध्ये २४९ मिळवले की इसवी सनाचा आकडा येतो.
 
- कलियुग संवत :
महाभारत संवत किंवा युधिष्ठिर संवत यास म्हणतात. ज्योतिष ग्रंथांत आणि शिलालेखांत कलियुग संचत्सराचा उल्लेख असतो. याची सुरुवात इसवी सनपूर्व ३१०२ या वर्षी (१७ फेब्रुवारीला) झाली. इसवी सनाच्या आकड्यात ३१०२, विक्रम संवताच्या आकड्यात ३०४३/४४ आणि शक संवताच्या आकड्यात ३१७९/८० मिळवले की कलियुग संवताचे ( Marathi History ) साल मिळते.
 
- गांगेय संवत :
तामिळनाडूमधील कलिंगनगरच्या कोणा राजाने सुरू केलेला हा संवत आहे. दक्षिणी भारतातील अनेक ठिकाणी हा वापरलेला आढळतो. गांगेय संवताच्या आकड्यामध्ये ५७९ मिळवले की इसवी सनाचा अंक येतो.
 
- गुप्त संवत :
याला गुप्त काल किंवा गुप्त वर्ष किंवा वलभी संवत म्हणतात. गुप्तवंशातील एखाद्या राजाने हा संवत सुरू केला असावा. नेपाळपासून ते गुजराथपर्यंत ह्याचा वापर होत असे. गुप्त संवताच्या सालामध्ये ३२० मिळवले की इसवी सनाचे वर्ष येते.
 
कालगणनेविषयी रंजक असे काही
 
- पहिले कॅलेंडर ( Marathi History ) ३१,१२५ वर्षांपूर्वी बनवले गेले. जगाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत विविध कालखंडात ३०च्या आसपास कॅलेंडर बनलेले आहेत. भारतात आतापर्यंत केवळ २० पंचांग तयार झाले आहेत.
 
- हिंदू कालगणनेत विक्रम संवत व शालिवाहन शके या कालगणना महत्त्वाच्या आहेत. आपण इंग्रजी कॅलेंडरनुसार व्यवहार करतो. परंतु हिंदू सणवार मात्र याच कालगणांनुसारच ( Marathi History ) साजरे होतात.
 
- जगाची आरंभापासून काळाचे गणित सुरू आहे. हिंदू धर्म व ज्योतिषशास्त्रात त्यास कालगणना म्हणतात. त्या हिशोबाने आजपासून जगाचे १ अब्ज ९७ कोटी २९ लाख ४० हजार १२७वे वर्ष सुरू ( Marathi History ) झाले आहे.
 
- संवत्सर एक वर्ष किंवा १२ महिन्यांचा कालावधी असतो. चांद्र वर्षानुसार हा काळ सुमारे ३५४ दिवसांचा असतो. यास 'चांद्र वर्ष' असेही म्हणतात. गुढी पाडव्याच्या दिवशी एक शक संवत्सर संपून दुसरे सुरू होते.
 
- संवत्सर म्हणजे ६० वर्षाचे कालचक्र असेही कालमापन आहे. ६० वर्षांत गुरूच्या सूर्याभोवती ५ व शनीच्या २ प्रदक्षिणा पूर्ण होतात. दोहोंच्या स्थितीची पुनरावृत्ती होते. गुरूप्रदक्षिणेचा १/१२ काळ हे एक संवत्सर.
 
- गुरूला सूर्याभोवती प्रदक्षिणा ( Marathi History ) करण्यास ११.८६२६ (सुमारे १२) वर्षे लागतात. म्हणजे एका संवत्सराचा अर्थ ०.९८८५५ वर्ष होय. या फरकामुळेच एकंदर ८६ संवत्सरांमध्ये ८५ वर्षे पूर्ण होतात.
 
- संवत्सर व वर्षाचा एकास एक संबंध जोडायचा तर ८५ वर्षांत एका संवत्सराचा लोप करावा लागतो. संवत्सर हा महाकालाचा ( Marathi History ) भाग मानतात. मास आदी विभाग सामावतात ते संवत्सर (सम्यक् वसन्ति मासादया: अस्मिन् ).