मार्च महिन्यात ( Festival Savings ) अनेक सण-वार आहेत. गुढीपाडवा, राम नवमी या सारखे महत्वपूर्ण सण एकापाठोपाठ येत आहेत. आता सणाचे दिवस म्हंटले की अनेक खर्च असतात. घरात किराणा सामान, इतर वस्तू, कपडे खरेदी केले जातात. यामुळे संपूर्ण महिन्याचे बजेट कोलमडते. अनेकदा उत्साहाच्या भरात आपण खूप अनावश्यक खर्च करतो. त्याचाच परिणाम आपल्या बजेटवर होतो. त्यामुळे यंदाच्या सणानिमित्त तुम्हीही जर खरेदी करणार असाल तर काही सोप्या टिप्स फॉलो करा जेणेकरून तुमचाही अनावश्यक खर्च कमी होईल. सणासुदीच्या काळात खरेदी करण्यापूर्वी तुमच्या बजेटची यादी तयार करा. हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
उदाहरणार्थ कपडे, किराणा सामान आणि इतर वस्तू प्रत्येकाचे वेगवेगळे बजेट ठरवून घ्या. यामुळे अनेकदा आपण अनावश्यक वस्तू घेणे टाळतो. ज्यामुळे पैश्यांची बचत होते.
आजकाल ( Festival Savings ) ऑनलाईन आणि ऑफलाईन शॉपिंग करताना सणासुदीच्या काळात भरपूर ऑफर्स असतात. त्यामुळे या ऑफर्सकडे विशेष लक्ष द्या. जर एखादी वस्तू ऑफलाईन तुम्हाला ५०० रुपयांत मिळत असेल तर ती ऑनलाईन ३०० पर्यंत मिळू शकते. त्यामुळे दोन्ही किंमतीची तुलना करून खरेदी करा. तसेच, जर तुमच्याकडे कार्ड किंवा शॉपिंग रिवॉर्ड्स असतील तर त्याचा वापर करा. यामुळे तुमचे खूप पैसे वाचतात. सणासुदीच्या काळात अनेकांना घर सजवण्याची आवड असते. अशावेळी महागडे होम डेकोर सामान खरेदी केले जाते. यावर खूप जास्त पैसे खर्च होतात. त्यामुळे DIY सजावटीवर ( Festival Savings ) भर द्या. घरच्या घरी असलेले साहित्य वापरून सोपी सजावट केल्याने घराला वेगळा लूक मिळतो आणि तुमचा अनावश्यक खर्च वाचतो.
जीवनावश्यक वस्तू
आजकाल किराणा सामान मॉलमध्ये जाऊन घेतले जाते. मॉलमध्ये अनेक वस्तू आपल्याला दिसतात. त्यामुळे, अनेकदा गरज नसलेली एखादी वस्तू आपण आवडली म्हणून घेऊन टाकतो. विशेषतः सणासुदीच्या काळात मॉलमध्ये अनेक आकर्षक वस्तू ठेवल्या जातात. पण कोणतीही वस्तू खरेदी ( Festival Savings ) करण्यापूर्वी त्याची तुम्हाला गरज आहे का हा विचार करा. आणि केवळ जीवनावश्यक वस्तू खरेदी करा.
स्मार्ट गिफ्टिंग
सणाच्या काळात अनेकदा एकमेकांना महागड्या भेटवस्तू दिल्या जातात. त्यामुळे स्मार्ट गिफ्टिंगचा पर्याय निवडा. उदाहरणार्थ एखादे हँडमेड गिफ्ट किंवा ग्रीटिंग कार्डही तुम्ही भेट म्हणून देऊ शकता. यासाठी कमी खर्च होतो. गिफ्ट देताना उपयुक्त भेटवस्तू द्या ज्यामुळे त्याचा उपयोग होईल.