ASUS Expansion : नागपूरमध्ये ASUS ची ग्रँड एन्ट्री! पॅन-इंडिया रिटेल गेम बदलणार का ?

Top Trending News    12-Apr-2026
Total Views |

asus
 
नागपूर : ( ASUS Expansion ) देशभरातील आपले रिटेल नेटवर्क अधिक मजबूत करण्याच्या दिशेने पाऊल टाकत, तैवान स्थित तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी एसुस इंडियाने नागपूरमध्ये आपले नवीन एक्सक्लुझिव्ह स्टोअर सुरू केले आहे. सुमारे 250 चौरस फूट क्षेत्रात पसरलेल्या या नव्या स्टोअरमध्ये एसुसचे विवोबुक, जेनबुक, रिपब्लिक ऑफ़ गेमर्स (रॉग) लॅपटॉप्स, गेमिंग डेस्कटॉप्स, ऑल-इन-वन डेस्कटॉप्स तसेच विविध अॅक्सेसरीज यांसारख्या प्रमुख उत्पादनांची विस्तृत श्रेणी उपलब्ध असेल. नागपूरमध्ये एसुसचे ( ASUS Expansion ) हे चौथे एक्सक्लुझिव्ह स्टोअर आहे. याचे अनावरण एसुसचे उपाध्यक्ष अर्नोल्ड सु यांच्या हस्ते केले जाईल.
 
या विस्ताराबाबत बोलताना, एसुसचे उपाध्यक्ष, अर्नोल्ड सु, “भारतामध्ये आमची रिटेल उपस्थिती वाढवत असल्याचा आम्हाला आनंद आहे. महाराष्ट्र हा आमच्यासाठी एक महत्त्वाचा बाजार असून नागपूरमध्ये सुरू केलेले हे नवीन स्टोअर ग्राहकांना आमच्या नव्या तंत्रज्ञानाचा अनुभव देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. आमच्या रणनीतिक रिटेल विस्ताराच्या माध्यमातून आम्ही ग्राहकांशी अधिक संवाद साधत नवीन टचपॉइंट्स निर्माण करत राहू." हे स्टोअर एसुस एक्सक्लुझिव्ह स्टोअर ( ASUS Expansion ) आनंदम आर्केड २, मॉडेल मिल कंपाऊंड, आनंदम वर्ल्ड सिटी, गणेश पेठ कॉलनी नागपूर येथे स्थित आहे.
 
एसुस ( ASUS Expansion ) ही तंत्रज्ञान क्षेत्रातील एक जागतिक अग्रणी संस्था आहे. जगभरातील लोकांचे जीवन अधिक समृद्ध करणारे, असाधारण अनुभव देणारे; तसेच जगातील सर्वात नाविन्यपूर्ण आणि वापरण्यास अत्यंत सुलभ अशी उपकरणे, घटक आणि उपाय (Solutions) ही संस्था उपलब्ध करून देते. ५,००० अंतर्गत संशोधन आणि विकास (R&D) तज्ञांच्या संघासह, एसुस ही संस्था 'आजच्या तंत्रज्ञानाची उद्यासाठी सातत्याने नव्याने मांडणी' करण्याकरिता जगभरात प्रसिद्ध आहे. गुणवत्ता, नाविन्य आणि रचना (Design) या क्षेत्रांत दररोज ११ हून अधिक पुरस्कार मिळवणारी ही संस्था, 'फॉर्च्यून'च्या 'जगातील सर्वाधिक प्रशंसित कंपन्यां'च्या यादीतही मानाचे स्थान पटकावून आहे.