अभिनेता अजय शाह यांचा गंगा नदीत बुडून मृत्यू

05 Oct 2024 09:50:55

                                   actor
 
जिगसा : बॉलिवूड अभिनेता अजय कुमार शाह याचा गंगा नदीत बुडून मृत्यू झाला. अजयने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. मुंबईत राहून मुलांना अभिनय शिकवण्यासाठी तो एका अभिनय शाळेत काम करायचा. काही दिवसांपूर्वी अजय हा आराह येथील त्याच्या घरी आला होता आणि धार्मिक विधीनिमित्त तो गंगा नदीत स्नान करण्यासाठी गेला असता त्याचा पाय घसरला. त्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला.
 
अजयचे कुटुंबीय दोन दिवस चिंतेत होते. त्याची चप्पल सापडल्यानंतर आरा नगर पोलिस ठाण्यात माहिती देण्यात आली, त्यानंतर एनडीआरएफच्या पथकाने येऊन अजय कुमार शहा यांचा मृतदेह गंगा नदीतून बाहेर काढला. अजयचे वडील टाऊन पोलिस स्टेशन हद्दीतील रहिवासी होते. अजयचा मृतदेह गंगा पुलाजवळ सापडला होता. अजयने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये साईड रोल केले आहेत. हेरा फेरी, खट्टा मीठा, चुपके चुपके, भागमभाग यासह अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.
Powered By Sangraha 9.0