Viral Video Tiger : 'वाघिणीला दारूची ऑफर' प्रकरणात ट्विस्ट ! खरा गुन्हेगार तर....

30 Oct 2025 21:47:13

viral video
 
नागपूर :( Viral Video Tiger ) ४ ऑक्टोबर २०२५ रोजी महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेजवळील पेंच परिसरात एक विचित्र घटना घडल्याचा दावा करण्यात आला. ‘राजू पेंटर’नावाच्या इसमाचा आणि एका वाघिणीचा भन्नाट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच धुमाकुळ घालतोय. व्हिडिओमध्ये राजू पेंटर नशेत वाघिणीला ‘दारूची ऑफर’देताना दिसतो आहे. व्हिडिओच्या शिर्षकात तर हे सीसीटीव्ही फुटेज असल्याचे सांगण्यात आले असले तरी, हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट असून, एआय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार केला असल्याचे आल्याचे पेंच व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.
 
असा हादरला राजू 
 
कथित दृश्यांमध्ये ( Viral Video Tiger ) ‘राजू पेंटर’रात्री उशिरा पत्त्यांचा खेळ आटोपून नशेत घरी जात असतो. अचानक समोर दिसते एक ‘प्रचंड मांजर’प्रत्यक्षात ती वाघीण असते. पण दारूच्या नशेत राजू तिला मांजर समजतो, तिच्या अंगावरून हात फिरवतो, तिला हातातली बाटली ‘ऑफर’करतो. वाघीण अर्थातच ‘निर्व्यसनी’ निघते. बाटलीकडे पाहूनही दुर्लक्ष करते. व्हिडिओमध्ये पुढे दिसत आहे की वन अधिकारी तिथे धावत येतात, स्पॉटलाईट्स आणि ट्रँक्विलायझर गनच्या सहाय्याने वाघिणीला सुरक्षित जंगलात सोडतात.
 
सकाळी शुद्धीवर आल्यानंतर ( Viral Video Tiger ) राजू स्वतःचा व्हिडिओ पाहून हादरतो आणि दारू कायमची सोडतो. सोबतच, ‘राजूच्या घरगुती दारूचा व्यवसाय’सोशल मीडियावर चर्चेत येतो. राजूचा 'स्टार्टअप युनिकॉर्न होतोय' अशा विनोदी दाव्यांनी व्हिडिओची लोकप्रियता आणखीनच वाढली आहे. एआय तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या सामग्रीचा हा प्रकार पुन्हा एकदा समाजासमोर इशारा ठरत आहे. व्हिडिओच्या कमेंटमध्ये काही जागरुक मंडळींनी नोंदवले आहे. याचाच वापर खोट्या घटना, व्हिडिओ आणि अफवा पसरवण्यासाठी होतो असल्याच्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
 
पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या ( Viral Video Tiger ) हद्दीत अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. हा व्हिडिओ पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार झाला असून, भ्रामक व्हिडिओ असल्याचा खुलासा पेंच व्यवस्थापनाने केला आहे. वन्यजीव व्यवस्थापनाबाबत चुकीची माहिती देऊन भीती आणि दिशाभूल पसरवणे गंभीर गुन्हा असुन, खोटा कंटेंट तयार करणाऱ्यांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२, माहिती तंत्रज्ञान अधिनियम तसेच अन्य कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्याचा इशाराही पेंचने दिला आहे
Powered By Sangraha 9.0