Bawankule Raid : पालकमंत्र्यांची गुप्त धाड ! ड्रॉवरमधील नोटांनी उडाली अधिकाऱ्यांची झोप

Top Trending News    07-Oct-2025
Total Views |
 

br 
 नागपूर : (Bawankule Raid) नागरिकांच्या सोयी सुविधांना प्राधान्य देऊन शासकीय सेवेतील गुणवत्ता सुधारण्यासाठी शासन कायमच प्रयत्न असत. विविध पातळीवर वेळोवेळी याबाबत आढावा घेऊन जास्तीत जास्त नागरिकांना उत्तम प्रशासनाचा प्रत्यय यावा, ही भूमिका कायमच राहिली आहे. खामला भागातील सह दुय्यम उपनिबंधक वर्ग- २ कार्यालयाबाबत अनेक तक्रारी होत्या. या तक्रारी थेट पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचल्या होत्या. काही कार्यालयांबाबत नागरिकांच्या असलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन आज खामला येथील सह दुय्यम उपनिबंधक वर्ग - २ कार्यालयाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Bawankule Raid) यांनी अचानक धाड टाकली.
 
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेही (Bawankule Raid) या कार्यालयात अचानक भेटीसाठी मुहूर्त शोधत होते. आलेल्या गंभीर तक्रारीची दखल घेऊन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल दुपारी थेट या कार्यालयात धाड टाकली. धाड टाकेपर्यंत चांगलीच गुप्तता पाळण्यात आली. अचानक ते कार्यालयात हजर झाल्याचे बघताच अधिकाऱ्यांची घाबरगुंडी उडाली. येथे अधिकाऱ्यांच्या टेबलच्या ड्रावरची तपासणीही त्यांनी केली. त्यात रोख आढळून आल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यामुळे कार्यालयातील सर्वच अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. त्यांनी अधिकाऱ्यांच्या टेबलच्या ड्रावरमध्ये सापडलेल्या रक्कमेबाबत पोलिसांना योग्य तो तपास करण्याचे निर्देश दिले. नागरिकांना जर कोणत्याही शासकीय कामासाठी कोणी लाच अथवा इतर कशाची मागणी केल्यास थेट तक्रार करण्याचे आवाहन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Bawankule Raid) यांनी केले.
 
भ्रष्टाचाराविरुद्ध सरकारची शून्य-सहिष्णुतेची भूमिका आहे. कुणीही नागरिकांकडून लाच मागितल्यास न घाबरता तक्रार करा. पारदर्शक प्रशासन हेच आमचे ध्येय आहे. राज्यात महसूल विभाग अधिक जबाबदार आणि जनतेसाठी सुलभ करण्यासाठी पुढील काही दिवसांत सर्व उपनिबंधक कार्यालयांवर विशेष तपास मोहिमा राबविण्यात येईल.
- चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री व पालकमंत्री. (Bawankule Raid)