ज्योतिषशास्त्र ( Color Numerology ) या शास्त्रावर अनेकांचा विश्वास असतो. ज्योतिषांचा सल्ला लोक अनेक बाबतीत घेतात आणि त्यानुसार आपल्या आयुष्यातील महत्वाचे निर्णय घेतात. कोणत्या दिवशी काय खरेदी करावे किंवा शुभ मुहूर्त पाहून एखादे कार्य करण्यात येते. तसेच अंकशास्त्र देखील बऱ्याच गोष्टींचे भाकीत करते. त्याप्रमाणेच तुमच्या जन्मतारखेवरून तुमच्यासाठी कोणता रंग शुभ आहे हे समजले जाते. पाहुयात कोणत्या जन्मतारखेसाठी कोणता रंग आहे शुभ.
शुभांक १ : ज्या लोकांचा शुभांक १ आहे त्यांच्यासाठी लाल, गुलाबी, फिकट जांभळा, केशरी आणि पिवळा रंग शुभ ( Color Numerology ) आहे.
शुभांक २ : ज्या लोकांचा शुभांक २ आहे त्यांच्यासाठी निळ्या रंगाच्या छटा, गुलाबी आणि पांढरा रंग चांगला आहे. निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या शेड् वापरू शकता.
शुभांक ३ : ज्या लोकांचा शुभांक ३ आहे त्यांच्यासाठी फिकट पिवळा, हिरवा, पांढरा आणि तपकिरी रंग शुभ आहे.
शुभांक ४ : ज्या लोकांचा शुभांक ४ आहे त्यांनी पांढरा, पिवळा, गेरू, केशरी, हिरवा आणि फिकट निळा रंग वापरावा. पण गडद जांभळा आणि लाल रंग वापरणे टाळावे. रंग निवडताना ( Color Numerology ) काळजी घ्या.
शुभांक ५ : ज्या लोकांचा शुभांक ५ आहे त्यांच्यासाठी पांढरा, आकाशी, फिकट तपकिरी, गुलाबी, फिकट हिरवा आणि नारंगी रंग चांगला आहे.
शुभांक ६ : ज्या लोकांचा शुभांक ६ आहे त्यांनी तपकिरी, फिकट पिवळा, पांढरा, हिरवा आणि निळा रंग वापरावा.
शुभांक ७ : ज्या लोकांचा शुभांक ७ आहे त्यांच्यासाठी निळ्या रंगाच्या शेड्, गुलाबी आणि पांढरा रंग शुभ आहे. ऑफिस आणि घरासाठी हे रंग वापरू ( Color Numerology ) शकता.
शुभांक ८ : ज्या लोकांचा शुभांक ८ आहे त्यांनी लाल, गुलाबी, फिकट जांभळा, चॉकलेटी, नारंगी, काळा, पिवळा आणि गेरू रंग वापरावा.
शुभांक ९ : ज्या लोकांचा शुभांक ९ आहे त्यांच्यासाठी लाल, गेरू आणि पिवळा रंग शुभ आहे.