बुलढाणा : अंबुजा सिमेंट्स (Ambuja Cement ) या कंपनीने बुलढाण्यातील एक बांधकाम कंत्राटदार अफसर खान यांच्या प्रगतीचा नुकताच गौरव केला आहे. हा गौरव सोहळा 17 डिसेंबर २०२५ पार पडला. ‘अंबुजा सिमेंट्स’च्या (Ambuja Cement ) तांत्रिक सेवा पथकाने केलेल्या साइट-भेटीतून अत्यंत उपयुक्त असे मार्गदर्शन केले. तसेच, खान यांनी काँक्रीट हाताळणीपासून ते क्युरिंग प्रक्रियेपर्यंतचे प्रत्यक्ष काम अधिक व्यवस्थित आणि योग्य पद्धतीने कसे व्यवस्थापित करायचे या बाबतही ते अवगत झाले.
याआधी बांधकाम पद्धतींची स्पष्ट माहिती नसल्यामुळे खान यांच्या प्रकल्पांमध्ये उशीर होत असे तसेच गुणवत्ता-संबंधीच्या समस्या निर्माण होत असत. ‘अंबुजा सिमेंट्स’ने (Ambuja Cement ) आपल्या प्रीमियम उत्पादनांसह तज्ज्ञ तांत्रिक सेवेद्वारे त्यांना योग्य दिशा दिली. अशा सुटसुटीत आणि सुधारित पद्धती वापरून पूर्ण केलेला खान यांचा ‘एसीटी’ (अंबुजा सर्टिफाईड टेक्नॉलॉजी) प्रकल्प हा मजबुती, दर्जेदार काम आणि कौशल्यासाठी विशेष ठरला आहे. ग्राहकांसह स्थानिक बांधकाम व्यावसायिकांनीही त्याची प्रशंसा केली.
आज अफसर खान हे प्रत्येक प्रकल्पात भरपूर अनुभव घेऊन पोहोचतात त्यासोबतच ते वैज्ञानिक पद्धती आणि तांत्रिक शिस्त घेऊन आपल्या कार्याला पूर्ण करतात. स्पष्ट तांत्रिक ज्ञान किती मोठा बदल घडवू शकते, हे त्यांच्या या वाटचालीतून दिसून येते आहे. अशा प्रकारे व्यावसायिकांना सक्षम बनवण्यास अंबुजा सिमेंट्स (Ambuja Cement ) कटिबद्ध आहे. कारण, योग्य पद्धतीने केलेलं बांधकाम हेच खऱ्या अर्थाने चांगल्या बांधकामाचा यशस्वी नमुना होऊ शकते.