नागपूर : ( BJP Ticket Drama ) महापालिका निवडणूकीसाठी भाजपने अनेकांना धक्का दिला आहे. गेली दीड दशके सत्तेत असल्याने यावेळी अनेक अनुभवी व दिग्ग्जांना नारळ देत नव्या चेहऱ्यांना संधी दिली. बंडखोरीची शक्यता लक्षात घेता, फारसा गाजवाजा न करता उमेदवारांना परस्पर बोलावून पक्षाचे एबी फॉर्म देण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खामला येथील जनसंपर्क कार्यालयातून सकाळपासूनच ते वितरीत करण्यात येत होते. सुमारे ७० उमेदवारांना त्यांच्या एबी फॉर्मबद्दल फोनवरून माहिती देण्यात आली होती. उमेदवारांनी एबी फॉर्म घेतले, परंतु पक्षाच्या उमेदवारांची ( BJP Ticket Drama ) अधिकृत यादी रात्रीपर्यंत जारी करण्यात आली नव्हती.
दिग्गजांना नारळ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे समर्थक ( BJP Ticket Drama ) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक माजी नगरसेवकांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. यामध्ये तीन ते चार टर्म नगरसेवक म्हणून काम केलेल्या इच्छुक उमेदवारांचा समावेश आहे. ज्या माजी नगरसेवकांना तिकीट नाकारले यात नासुप्रचे माजी विश्वस्त संजय बंगाले, माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर, माजी स्थायी समिती अध्यक्ष अविनाश ठाकरे, माजी उपमहापौर मनीषा कोठे, माजी नगरसेविका चेतना टांक, ज्येष्ठ नगरसेविका वर्षा ठाकरे आणि माजी नगरसेवक हरीश दिकोंडवार यांचा समावेश आहे. माजी महापौर अर्चना डेहनकर यांनाही तिकीट नाकारले गेले. यासोबतच दिलीप दिवे, पल्लवी शामकुळे यांचाही समावेश आहे.
अनुभवींना पुन्हा संधी
पक्षाने माजी स्थायी समिती अध्यक्ष विक्की कुकरेजा, माजी महापौर माया इवनाते, माजी स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, माजी विधी समिती सभापती धर्मपाल मेश्राम, भाजपचे माजी शहराध्यक्ष बंटी कुकडे आणि माजी परिवहन सभापती बाल्या बोरकर, माजी उपमहापौर संदीप जाधव, प्रगती पाटील, अश्वीनी जिचकार, साधना बरडे,संगीता गिऱ्हे, भूषण शिंगणे, शेषराव गोतमारे यांचा समावेश आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये सामील झालेले माजी नगरसेवक मनोज साबळे, दर्शनी धवड आणि नेहा निकोसे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.
काही प्रभागांमध्ये स्पर्धा सुरूच
काही प्रभागांमध्ये भाजपच्या ( BJP Ticket Drama ) उमेदवारीसाठी स्पर्धा अजूनही सुरूच आहे. सुमारे ३५ जागा अशा आहेत जिथे पक्ष अजूनही गुप्तता पाळत आहे. भाजपने उमेदवारीसाठी सर्वेक्षण केले होते. याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांचीही मदत घेण्यात आली आहे. गडकरी आणि फडणवीस यांच्यात तिकिटावरून बरीच चर्चा झाली. केंद्रीय मंत्री गडकरींच्या खामला जनसंपर्क कार्यालयातून एबी फॉर्म वाटप सुरू झाले. उमेदवार आणि त्यांचे समर्थक कार्यकर्ते एबी फॉर्मसाठी पोहोचले. उमेदवारांचे फॉर्म जनसंपर्क कार्यालयातच तयार करण्यात आले. उमेदवारांना मंगळवारी सकाळीच त्यांच्या क्षेत्रातील झोन कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यास सांगण्यात आले. बंडखोरी आणि विरोधाची शक्यता लक्षात घेऊन नामांकन रॅली काढू नये, असे सांगण्यात आले.
तीन तरूणीही उमेदवार
भाजपने ( BJP Ticket Drama ) दोन तरूणींनाही उमेदवारी दिली आहे. यात प्रभाग क्र. २४मधून २४ वर्षाची बीई इंजीनीअर झालेल्या दुगेंश्वरी कोसेकर हिचा समावेश आहे. तर, प्रभाग क्र. ३७ मधून हॉटेल मॅनेजमेंट केलेल्या २८ वषींय निधी तेलगोटे तसेच प्रभाग क्र. ३६ मधून पक्षाच्या फायरब्रॅण्ड नेत्या व अर्थतज्ज्ञ शिवाणी दाणी यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे.
नातेवाईकही यादीत
परिवारवादावर आकांडतांडव करणाऱ्या भाजपने त्यांच्या यादीत नातेवाईकांनाही उमेदवारी दिली. यात माजी आमदार डॉ. मिलींद माने यांच्या पत्नी डॉ. सरीता माने, माजी आमदार विकास कुंभारे यांचे पुत्र श्रेयस कुंभारे, माजी नगरसेवक विजय चुटेले यांच्या पत्नी श्रध्दा चुटेले, मुन्ना यादव यांच्या पत्नी लक्ष्मी यादव यांचाही ( BJP Ticket Drama ) समावेश आहे.