Cancer Alarm : जेवणच ठरतंय घातक ? अनियंत्रित खानपानामुळे कॅन्सरचा वाढता धोका

30 Dec 2025 17:44:30

cancer
 
नागपूर : ( Cancer Alarm ) कर्करोगाच्या अनेक प्रकारांपैकी पोटाचा कर्करोग (स्टमक कॅन्सर/गॅस्ट्रिक कॅन्सर) हा एक गंभीर आजार आहे. अनियंत्रित व असंतुलित खानपान केल्यास या कर्करोगाचा धोका वाढतो. गत ५ वर्षांत पोटाच्या कर्करोगाच्या रुग्णसंख्येत सुमारे ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यापूर्वी कर्करोगाच्या ( Cancer Alarm ) एकूण रुग्णांपैकी ५ टक्के रुग्ण पोटाच्या कर्करोगाचे होते, मात्र आता ही संख्या ८ टक्क्यांपर्यंत पोहोचली. वेळीच खानपानात सुधारणा न केल्यास पोटाचा कर्करोग कुणालाही जडू शकतो. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथील कर्करोग विभागात दरवर्षी सरासरी २,२०० नवे कर्करोग रुग्ण नोंदविले जातात तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्करोग ( Cancer Alarm ) रुग्णालयात दरवर्षी सुमारे ५,५०० रुग्ण दाखल होतात. यापैकी सुमारे ८ टक्के म्हणजेच अंदाजे ६१६ रुग्ण पोटाच्या कर्करोगाचे असल्याचा अंदाज आहे.
 
एकूण रुग्णांपैकी ८ टक्के रुग्णांना पोटाचा कर्करोग
 
केस-१ : वेदनाशामक औषधांमुळे आतडी चिकटली
 
बुधवारी मेडिकलच्या कर्करोग ( Cancer Alarm ) विभागात ५० वर्षीय रुग्ण दाखल झाला. पोटात तीव्र वेदना होत असल्याने तो सामान्य दवाखान्यातील औषधे, विशेषतः वेदनाशामक गोळ्या घेत होता. तपासणीत त्याच्या आतड्या चिकटल्याचे आढळले. सतत घेतल्या जाणाऱ्या औषधांमुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वेळेवर निदान न झाल्याने आजार तिसऱ्या टप्प्याच्या पुढे गेल्याचे निदर्शनास आले.
 
केस-२ : झाड-फुकीत वेळ वाया
 
एका रुग्णाला अनेक महिन्यांपासून पोटदुखीचा त्रास होता. त्याने झाड-फूक व जडीबुटी उपचारांवर भर दिला. मात्र आजार वाढतच गेला. नंतर अ‍ॅलोपथी उपचार सुरू केल्यावर तात्पुरता आराम मिळाला, पण वेदना अधिक तीव्र झाल्या. कर्करोग विभागात तपासणी केली असता पोटात पाणी साचल्याचे व त्यामागे पोटाचा कर्करोग ( Cancer Alarm ) असल्याचे निष्पन्न झाले.
 
पोटाच्या कर्करोगाची मुख्य कारणे
 
पोटाच्या कर्करोगामागील प्रमुख कारण म्हणजे हेलिकोबॅक्टर पायलोरी (एच. पायलोरी) हा जीवाणू आहे. हा जीवाणू पोटाच्या आतल्या आवरणात राहतो. पोटाच्या पेशींची अनियंत्रित वाढ झाल्याने पुढे कर्करोगाचा ट्युमर तयार होतो. तसेच सतत अनियंत्रित व अस्वास्थ्यकर खानपान केल्यास पोटाच्या कर्करोगाचा ( Cancer Alarm ) धोका अधिक वाढतो.
 
ही लक्षणे दिसल्यास सावध व्हा
 
पोटाचा सतत दुखणे, अस्वस्थता, वजन घटणे, भूक न लागणे, पोट फुगल्यासारखे वाटणे, पोटात सूज किंवा गाठ जाणवणे, मळमळ, उलट्या, गिळताना त्रास होणे, मलातून रक्त जाणे, सतत थकवा व कमजोरी, जास्त डकार येणे, वारंवार आम्लपित्ताचा त्रास होणे ही पोटाच्या कर्करोगाची प्रारंभिक लक्षणे असू शकतात.
 
तपासणी करणे गरजेचे
 
कर्करोगाची ( Cancer Alarm ) शंका आली, लक्षणे दिसली किंवा न दिसली तरीही तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे नेमक्या आजाराचे निदान वेळेत होऊ शकते. ग्रामीण भागात अजूनही याबाबत जागरुकतेचा अभाव आहे. मेडिकलच्या कर्करोग विभागात सर्व तपासण्या व उपचार मोफत उपलब्ध असून विविध शासकीय आरोग्य योजनांचाही लाभ दिला जातो.- डॉ. अशोक कुमार दीवान,
प्रमुख, कर्करोग रोगविभाग, मेडिकल नागपूर
Powered By Sangraha 9.0