Fake Shalarth ID Scam : फसव्या शालार्थ मुळे शिक्षक हैराण ! बदली नको, मूळ शाळा हवी

19 Apr 2025 20:07:40
 
 
a
 
नागपूर : ( Fake Shalarth ID Scam ) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस शिक्षकांची भरती व त्यांच्याद्वारे बोगस कागदपत्रांच्या आधारे शालार्थ आयडी मिळवून शासकीय वेतन लाटल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. हे सर्व प्रकरण माध्यमिक शिक्षण विभागाशी संबंधित आहेत. या गंभीर प्रकारामुळे या विभागात कार्यरत प्रामाणिक कर्मचाऱ्यांमध्ये भीती आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
बोगस शिक्षक नियुक्ती आणि शालार्थ आयडी ( Fake Shalarth ID Scam ) गुन्हे दाखल करून अधिकारी, कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. अधिकारी, कर्मचारी सुद्धा धास्तावले आहे. या ( Fake Shalarth ID Scam ) प्रकरणाचे पडसाद आता जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील दिसू लागले आहेत. या विभागात काम करण्यास अनेकांची उत्सुकता लयास गेली आहे. त्यांनी नुकतीच प्रभारी सीईओ डॉ. कमलकिशोर फुटाणे यांची भेट घेत आपली व्यथा मांडली येथून मुक्त करण्याची विनंती केली.
 
काही कर्मचाऱ्यांनी तर आपल्या मूळ आस्थापना असलेल्या विभागप्रमुखांकडे अर्ज करून आपली माध्यमिक विभागात ड्युटी लावू नये, अशी विनंती केल्याची माहिती आहे. या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, काही अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रवृत्तीमुळे संपूर्ण विभागाची प्रतिमा मलिन झाली आहे. याचा त्रास प्रामाणिक कर्मचाऱ्यांनाही सहन करावा लागत आहे. भविष्यात कोणत्याही चौकशीत आपली नाहक भरड होऊ नये, अशी भीतीही या कर्मचाऱ्यांना सतावत आहे. एक प्रकारची अस्वस्थता कर्मचाऱ्यांमध्ये पहायला मिळत आहे.
 
कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ भेटीला आले होते. त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले. अशा कारणामुळे विभाग सोडणे योग्य नाहीत. एखाद्या एक दोषी आहे म्हणून सर्वच दोषी आहेत, असे म्हणता येणार नाही. त्यांच्या विनंतीवर योग्य विचार केल्या जाईल.
- डॉ. कमलकिशोर फुटाणे, प्रभारी सीईओ, जि.प.
Powered By Sangraha 9.0