Pik Vima Yojana : पीक विम्याचा पाऊस ! हजारो शेतकऱ्यांना मिळणार कोटींचा आधार

20 Apr 2025 17:55:53

pik
 
नागपूर : ( Pik Vima Yojana ) यंदाच्या खरीप हंगामाची तयारी सुरू असतानाच मागील हंगामातील पीक विम्याचा मोठा निधी ( Pik Vima Yojana ) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ४१,२९८ शेतकऱ्यांना एकूण ६१.२९ कोटी रुपयांची विमा भरपाई मिळणार आहे. विम्याची सर्वाधिक रक्कम उमरेड तालुक्याला १०.९५ कोटी रुपये मंजूर झाली असून, त्यापाठोपाठ नरखेडला १०.५४ कोटी, तर भिवापूरला ८.७७ कोटी रुपये मिळणार आहेत. दुसरीकडे, रामटेक तालुक्याला केवळ २ लाख रुपयेच मंजूर झाले असून, हा सर्वात कमी वाटप असलेला तालुका ठरला आहे.
 
मागील वर्षी २.६८ लाख शेतकऱ्यांनी विमा घेतला
 
मागील खरीप हंगामात शासनाच्या योजना अन्वये शेतकऱ्यांना फक्त १ रुपयात विमा काढता आला. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. २,६८,८४० शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरला ( Pik Vima Yojana ) असून त्यातून २.६९ कोटी रुपये जमा झाले. या योजनेत केंद्र आणि राज्य सरकारचा १५३.६८ कोटी रुपयांचा वाटा आहे.

काटोल मधील अर्ज बाद, फेरतपासणीचे आदेश
 
पीक विमा प्रकरणी नुकतीच जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीत कृषी आणि महसूल विभागाचे अधिकारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि शेतकरी सहभागी होते. यावेळी काटोल तालुक्यातील ७०,००० शेतकऱ्यांचे अर्ज बाद झाल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे या सर्व अर्जांची फेरतपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. कोणताही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहू नये, असे त्यांनी स्पष्ट निर्देश दिले.
 
तालुकानिहाय विमा मंजुरीचा तपशील (कोटी रुपये)
 
उमरेड 21,3355,42910.95
नरखेड 35,7747,70610.54
भिवापूर 23,8105,0138.77
कुही 33,6515,9867.97
सावनेर 23,0845,3666.30
काटोल 25,6794,8695.67
पारशिवनी 17,3101,6482.51
नागपूर ग्रा 7,1771,2432.42
हिंगणा 10,9361,8612.64
कळमेश्वर 15,8991,2891.88
कामठी 7,6495091.07
मौदा 30,6512510.36
रामटेक 15,9221280.20
 
Powered By Sangraha 9.0