दिल्ली: ( Startup Scam ) एका मोठ्या फसवणुकीचा पर्दाफाश झाला आहे. ज्यामध्ये कर्जाच्या पैशांचा वापर आलिशान खरेदीसाठी करण्यात आला. भारतातील सर्वांत मोठ्या स्टार्टअप घोटाळ्यात गेकसोल इंजिनिअरिंग चे प्रवर्तक अनमोल सिंग जग्गी आणि पुनित सिंग जग्गी यांना इलेक्ट्रीक वाहने खरेदी करण्यासाठी मिळालेल्या कर्जाच्या 262 कोटी रुपये भ्रष्टाचारासाठी वापरल्याचे समोर आले आहे. हे कर्ज पैशांचे काही भाग 43 कोटी रुपये किमतीच्या आलिशान फ्लॅटच्या खरेदीसाठी ( Startup Scam ) आणि 26 लाख रुपये किमतीच्या प्रीमियम गोल्फ सेटच्या खरेदीसाठी खर्च करण्यात आले.
या घोटाळ्यात पुण्यातील एक बंद कारखाना आणि प्रवर्तकांच्या कुटुंबीयांच्या खात्यात 11 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले, ज्यामुळे सेबी (सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) ने तपास सुरू केला आहे. या घोटाळ्यामुळे भारताच्या स्टार्टअप इकोसिस्टममध्ये ( Startup Scam ) एक मोठा धक्का बसला आहे. सेबीच्या तपासानुसार, संबंधित निधीचा वापर वैयक्तिक खर्च आणि संबंधित पक्षांना हस्तांतरित करण्यात आला होता.
सेबी तपासातील मुख्य निष्कर्ष :
१) इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीसाठी मिळालेल्या पैशांचा वापर गो-ऑटो, कॅपब्रिज आणि डीएलएफ सारख्या कंपन्यांकडे केला गेला, जिथे ते द कॅमेलियास मध्ये फ्लॅट खरेदी करण्यासाठी वापरण्यात आले.
२) अनमोल आणि पुनित जग्गी यांनी वैयक्तिक खात्यांत मोठ्या प्रमाणात रक्कम हस्तांतरित ( Startup Scam ) केली, त्यात 382 कोटी रुपये इतर संस्थांना दिले गेले, ज्यामध्ये 246 कोटी रुपये संबंधित पक्षांना गेले.
३) सेबी ने असेही उघड केले की प्रवर्तकांनी कंपनीचे पैसे वैयक्तिक खर्चासाठी वापरले, ज्यात 26 लाख रुपये किमतीचा गोल्फ सेट, 6.2 कोटी रुपये आईला, 2.99 कोटी रुपये पत्नीला आणि इतर वैयक्तिक खर्चांसाठी विविध रक्कमा हस्तांतरित केली.
कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा अभाव :
सेबी ने सांगितले की जेन्सोल इंजिनिअरिंग मध्ये आंतरिक नियंत्रण आणि कॉर्पोरेट प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले. प्रवर्तक एक सूचीबद्ध सार्वजनिक कंपनी चालवत होते, मात्र त्यांनी ती त्यांची खासगी कंपनी बनवली आणि कंपनीचे पैसे संबंधित पक्षांना हस्तांतरित केले आणि अनावश्यक खर्चासाठी ( Startup Scam ) वापरले.
सेबीच्या विश्लेषणानुसार अधिक माहिती:
१) इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी करण्यात आलेल्या 664 कोटी रुपयां पैकी 568 कोटी रुपये खर्च झाल्याचे पुरवठादारांनी सांगितले.
२) 262.13 कोटी रुपये कसे वापरले गेले, याबद्दल सेबी ने प्रश्न उपस्थित केला, कारण कर्जाचा शेवटचा हप्ता मिळाल्यापासून एक वर्षापेक्षा जास्त कालावधी गेला.
प्रवर्तकांच्या वैयक्तिक खर्चांमध्ये :
१) 26 लाख रुपये किमतीचा गोल्फ सेट टेलरमेड कडून
२) 6.2 कोटी रुपये अनमोल जग्गी यांच्या आईला
३) 2.99 कोटी रुपये पत्नी मुग्धा कौर जग्गी यांना
४) 1.86 कोटी रुपये परकीय चलन खरेदीसाठी
५) 17.28 लाख रुपये टायटन कंपनीला
६) 11.75 लाख रुपये डीएलएफ होम्सला
७) 3 लाख रुपये मेकमायट्रिपला
जेन्सोलचे प्रवर्तक अनमोल आणि पुनित सिंग जग्गी यांना कंपनीच्या संचालक पदावरून काढून टाकले गेले आणि त्यांना बाजारात प्रवेशावर बंदी घालण्यात आली. कंपनीचा स्टॉक स्प्लिट सेबीने थांबवला आहे.