Ice water facial : बर्फाने चेहरा उजळतो की जळतो ? आइस वॉटर फेशियलची खरी गोष्ट !

21 Apr 2025 20:14:11

ice w
 
( Ice water facial ) उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचेला थंडावा देण्यासाठी बर्फाचं पाणी वापरणं सामान्य गोष्ट आहे. ‘आइस वॉटर फेशियल’ ( Ice water facial ) या नावाने ओळखली जाणारी ही पद्धत त्वचेला ताजेतवाने ठेवण्यासाठी फायदेशीर मानली जाते. चेहऱ्यावर चमक येण्यासाठी आणि त्वचेला शांतता मिळवण्यासाठी अनेक जण याचा वापर करतात. पण चुकीच्या पद्धतीने केल्यास हेच फेशियल ( Ice water facial ) तुमच्या त्वचेला त्रासदायक ठरू शकतं.
 
बर्फाच्या पाण्याचे संभाव्य तोटे
 
1) त्वचा जड होणे 
जर बर्फ थेट त्वचेवर लावला तर त्वचेचा पोत जड होऊ शकतो आणि नैसर्गिक चमक हरवू शकते.
 
2) जळजळ आणि खवखव
थेट बर्फाचा संपर्क झाल्यास त्वचेला जळजळ, खाज किंवा इरिटेशन जाणवू शकतं. त्यामुळे बर्फ रुमाल किंवा कापसामध्ये गुंडाळून वापरणं आवश्यक आहे.
 
3) बॅक्टेरिया संसर्गाचा धोका
बाहेरून आल्यानंतर चेहरा न धुता फेशियल केल्यास चेहऱ्यावरील धूळ आणि बॅक्टेरिया त्वचेमध्ये अडकू शकतात.
 
4) संवेदनशील किंवा कोरड्या त्वचेस त्रास
अतिसंवेदनशील त्वचेसाठी आइस फेशियल घातक ठरू शकतं. कोरड्या त्वचेला देखील या प्रक्रियेने चिडचिड किंवा कोरडेपणाचा त्रास होऊ शकतो.
 
5) रक्ताभिसरणावर परिणाम
बर्फामुळे त्वचेमधील रक्तप्रवाह मंदावू शकतो. त्यामुळे सतत किंवा चुकीच्या पद्धतीने केल्यास त्वचेला धोका निर्माण होतो.
 
योग्य काळजी घेतली तर फायदे
 
1) त्वचेला ताजेपणा
2) डोळ्यांखालची सूज कमी
3) नैसर्गिक चमक
4) थंडावा आणि आराम
 
जर तुम्हाला त्वचेशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर आइस फेशियल करण्यापूर्वी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
Powered By Sangraha 9.0