Social Media Addiction : '' डिजिटल दुनियेत हरवताय का ? सोशल मीडियाला ब्रेक मारायची वेळ आली आहे !"

21 Apr 2025 14:54:38

social
 
( Social Media Addiction ) आजच्या डिजिटल युगात प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे आणि प्रत्येकाजवळ सोशल मीडियाचं अकाउंटही आहे. आपले विचार, भावना मांडण्यासाठी आणि जगभरातील लोकांशी जोडलेलं राहण्यासाठी हे एक प्रभावी माध्यम ठरलं आहे. पण याचे फायदे जितके मोठे, तितकेच तोटेही गंभीर आहेत.
 
सोशल मीडियाचे संभाव्य धोके
 
ऑनलाइन ट्रोलिंग : यामुळे मानसिक तणाव वाढू शकतो.
 
व्यसनाधीनता : अनेकजण सतत फोनकडे लक्ष ठेवतात, त्यामुळे वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यावर विपरीत परिणाम ( Social Media Addiction ) होतो.
 
शारीरिक त्रास : डोळ्यांचे आजार, झोपेची समस्या, थकवा यासारखे त्रास होऊ शकतात.
 
मानसिक तणाव : नकारात्मक कमेंट्समुळे आत्मविश्वास ढासळतो, नैराश्य येऊ शकतं.
 
व्यसनातून मुक्त होण्यासाठी काही सोपे उपाय
 
१) सोशल मीडिया अ‍ॅप्स डिलीट करा
 
- अ‍ॅप्स सहज उपलब्ध असल्याने आपण वारंवार त्याचा वापर करतो. त्यामुळे सर्वप्रथम ते हटवा. सुरुवात कठीण वाटेल, पण हाच पहिला महत्त्वाचा टप्पा आहे.
 
२) नोटिफिकेशन बंद करा
 
- अ‍ॅप्स डिलीट करणे शक्य नसेल, तर किमान त्याची नोटिफिकेशन्स बंद करा. सततच्या सूचनांमुळे तुमचं लक्ष तिकडेच जातं.
 
३) वापरासाठी वेळ ठरवा
 
- सोशल मीडियासाठी एक विशिष्ट वेळ निश्चित करा. त्या वेळेतच अ‍ॅप्स वापरा. शक्य असल्यास अलार्म लावा. हळूहळू वेळ कमी करत जाणं फायदेशीर ठरेल. तुमचा वेळ, तुमचं मन, आणि तुमचं आयुष्य हे सर्व सोशल मीडियापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे. वेळेवर सावध व्हा आणि आरोग्यपूर्ण डिजिटल सवयी अंगीकारा.
 
 
Powered By Sangraha 9.0