Madhya Pradesh COVID Case : कोरोनाचा थरकाप अजूनही कायम ! मध्य प्रदेशात महिलेचा मृत्यू

23 Apr 2025 19:58:16

corona
 
इंदूर : ( Madhya Pradesh COVID Case ) मध्य प्रदेशात पुन्हा एकदा कोरोना विषाणुचे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना विषाणू रोखण्यासाठी रुग्णालय प्रशासन सर्व आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करत आहे. इंदूर शहरात कोविडचे दोन नवीन रुग्ण आढळले. यामध्ये एका 74 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. एका तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत महिला आधीच किडनीशी संबंधित आजाराने ग्रस्त होती. दुसऱ्या संक्रमित तरुणाला बऱ्याच काळापासून सर्दी आणि खोकल्याचा त्रास होता. सध्या या तरुणाला रुग्णालयाच्या वेगळ्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांच्या मते, त्याची प्रकृती स्थिर आहे.
 
अरबिंदो रुग्णालयाचे संचालक डॉ. विनोद भंडारी म्हणाले की, काही रुग्णांमध्ये सर्दी आणि खोकल्याची समस्या लवकर बरी होत नाही. अशा प्रकरणांमध्ये, एक विशेष फ्लू पॅनेल चाचणी केली जाते, ज्यामध्ये अनेक प्रकारच्या विषाणूंची चाचणी समाविष्ट असते. या तपासणीदरम्यान, तरुणामध्ये कोविड-१९ संसर्गाची पुष्टी ( Madhya Pradesh COVID Case ) झाली. त्यांनी असेही सांगितले की, त्या तरुणाला ताबडतोब वेगळे करण्यात आले आणि आता त्याची प्रकृती सुधारत आहे.
Powered By Sangraha 9.0