श्रीनगर : ( Amit Shah Warns Terrorists ) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बुधवारी पहलगाम येथे पोहचले. भारत दहशतवादापुढे मुळीच झुकणार नाही असेही त्यांनी जाहीर केलेत्यांनी या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. ज्या हल्लेखोरांनी हल्ला केला त्यांच्यापैकी कुणालाही आम्ही सोडणार नाही, असेही शाह म्हणाले.
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांना झालेले दुःख हे शब्दांत मांडताच येऊ शकता नाही, मी शब्द देतो ज्यांनी असा प्रकारे निष्पाप लोकांचे जीव घेतले त्यांच्यापैकी कुणालाच आम्ही सोडणार ( Amit Shah Warns Terrorists ) नाही, असेही अमित शाह म्हणाले. त्याचप्रमाणे त्यांनी या घटनेत ज्या पर्यटकांचा मृत्यू झाला त्यांच्या पार्थिवांजवळ जाऊन आदरांजली वाहिली. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने बैसरण व्हॅलीला पोहोचले.
येथे त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच, ज्या ठिकाणी हा दहशतवादी हल्ला झाला त्या पहलगामच्या बैसरन खोऱ्यात सुद्धा गृहमंत्री अमित शाह यांनी भेट दिली. अमित शाह हे कालपासूनच श्रीनगर येथे आलेले आहेत. त्यानंतर त्यांनी येथे उच्चस्तरीय बैठक देखील घेतली. जखमी रुग्णांना रुग्णालयात जाऊन भेटले. बैसरन खोऱ्यात अमित शाह यांच्यासोबत वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित आहेत.
एनआयएकडे तपास
दहशतवादी हल्ला झालेल्या ठिकाणी एनआयएकडून सध्या पाहणी केली जात आहे. तर, एनआयए फॉरेन्सिक टीमकडून पुरावे गोळा करण्यास सुरुवात झाली आहे. घटनास्थळी उपस्थित पर्यटकांचे जबाब देखील नोंदवून घेतले जात आहेत.