Pahalgam Attack : पहलगाम हल्ला अचानक नव्हता ! आधीच पीओकेत रचला गेला कट, 'राम' नावावर हल्ला

24 Apr 2025 12:00:51

pahal
 
( Pahalgam Attack ) जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 27 निष्पाप पर्यटकांची हत्या झाल्याच्या काही दिवस आधी पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची एक गुप्त बैठक झाली होती. रवळकोटमधील खाई गाला परिसरात 18 एप्रिल रोजी 'श्रद्धांजली परिषद' आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी कमांडर अबू मुसा याने उघडपणे भारतविरोधी जिहाद आणि हिंसाचाराचे आवाहन ( Pahalgam Attack ) केले. या वेळी 'जम्मू आणि काश्मीर युनायटेड मूव्हमेंट' (JKUM) संघटनेशी संबंधित अनेक दहशतवादीही उपस्थित होते.
 
अबू मुसा याने कलम 370 आणि 35 अ रद्द केल्यामुळे काश्मीरच्या लोकसंख्येच्या रचनेत बदल करण्याचा आरोप करत, नव्या दहशतवादी हल्ल्यांचे आवाहन केले. गुप्तचर संस्थांनी पडताळलेल्या एका व्हायरल व्हिडिओमध्ये तो म्हणतो :

“तुमचं सैन्य 10 लाख असो वा अधिक, आम्हाला फक्त ‘राम राम’ चा आवाज ऐकू येतो. आम्ही मैदानात उतरणार, बंदुका उचलणार, गळे कापणार आणि आमच्या शहीदांना सलामी देणार.”
 
यातून दहशतवादी संघटनांची कटकारस्थान, भारताविरुद्धचा राग आणि हिंसेच्या नव्या लाटेचा धोका ( Pahalgam Attack ) स्पष्ट दिसतो.

हल्ल्यांच्या क्रम सुरु होईल ?
 
अबू मुसा आणि इतर दहशतवादी नेत्यांच्या चिथावणीखोर भाषेमुळे आणि त्यांनी उघडपणे केलेल्या दहशतवादाचे उदात्तीकरण यामुळे उन्हाळ्यात काश्मीरमध्ये घुसखोरीची नवी लाट येण्याची भीती निर्माण झाली आहे. उन्हाळ्यात पारंपारिक घुसखोरीचे मार्ग (कुपवाडा, पूंछ आणि राजौरी) अधिक सक्रिय होतात आणि या मार्गांनी दहशतवादी कारवाया तीव्र होऊ शकतात.
 
एक बैठक आयोजित
 
हा कार्यक्रम अकीफ हलीम आणि अब्दुल वहाब या दोन दहशतवादींच्या स्मृतिप्रीत्यर्थ ( Pahalgam Attack ) आयोजित करण्यात आला होता. कुपवाडा येथे झालेल्या चकमकीत भारतीय सैन्याच्या 21 व्या राष्ट्रीय रायफल्सने अकीफ हलीमला ठार मारले. तोयबा आणि त्याच्या संलग्न गट पीपल्स अँटी-फासिस्ट फ्रंटशी संबंधित अब्दुल वहाबला बारामुल्लाच्या सोपोर भागात ठार मारण्यात आले. दोन्ही दहशतवादी एकाच कुटुंबातील होते आणि ते पीओकेचे रहिवासी होते.
 
पाकिस्तानचा पाठिंबा
 
गुप्तचर संस्थांनी अशी शंका व्यक्त केली आहे की या परिषदेला पाकिस्तानी प्रशासनाने सुरक्षा आणि लॉजिस्टिकल मदत पुरवली होती. अवामी कृती समितीने यापूर्वी असा दावा केला होता की या कार्यक्रमात कोणतीही दहशतवादी संघटना सहभागी होणार नाही, परंतु मंचावर अनेक सक्रिय लष्कर दहशतवाद्यांची उपस्थिती आणि मृत दहशतवाद्यांचा 'गौरव' यामुळे दहशतवाद्यांनी हा शक्तीप्रदर्शनाचा कार्यक्रम बनवला.
 
 
 
Powered By Sangraha 9.0