Pahalgam Terror Attack : "जगाच्या अंताची चाहूल ? गुजरातच्या महिलेचा थरारक अनुभव !"

24 Apr 2025 14:14:27

pahal
 
( Pahalgam Terror Attack ) काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात गुजरातच्या भावनगर येथील यतीश परमार आणि त्यांचा मुलगा स्मित यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. संपूर्ण कुटुंबाने घर विकून मोरारी बापूंच्या प्रवचनासाठी ही यात्रा आखली होती. यतीश, पत्नी काजल आणि मुलगा स्मितसह सुरेंद्रनगरहून जम्मू तवीला ट्रेनने गेले होते. त्यांच्यासोबत गुजरातमधून १६ जण गेले होते, त्यातील इतर १२ जण सुखरूप परतले ( Pahalgam Terror Attack ) आहेत. बैसरन व्हॅलीमध्ये फोटो काढत असताना अचानक गोळीबार सुरू झाला, असं पुष्पा बेन सांगतात. “समोर लोक खाली पडू लागले, आम्ही भीतीने जमिनीवर पडलो आणि सगळं सामान टाकून जीव वाचवण्यासाठी धावलो,” त्या म्हणाल्या.
 
दहशतीचे थरकाप जनक क्षण
 
दुपारी २:३० च्या सुमारास, मिनी स्वित्झर्लंड गेटजवळ दोन सशस्त्र पुरुषांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला, अशी आठवण अस्मिता बेन वाघेलांनी सांगितली. “आम्ही पाहिलं की ते अगदी जवळ आहेत, आम्ही ताबडतोब पळालो,” त्या म्हणाल्या. जखमी बिनूभाई यांनी जमिनीवर पडलेले डझनभर मृतदेह पाहिल्याचं सांगितलं. “पूर्ण गोंधळ होता... आणि हे आम्ही कधीही विसरणार नाही,” त्यांनी भरल्या आवाजात सांगितलं.
 
शौर्याची मिसाल : सय्यद हुसेन शाह
 
दहशतवाद्यांनी हल्ला सुरू केल्यावर, पर्यटकांना घोडेस्वारी सेवा देणारे सय्यद हुसेन शाह यांनी धाडस दाखवून दहशतवाद्यांचा प्रतिकार ( Pahalgam Terror Attack ) केला. “हे आमचे पाहुणे आहेत, त्यांच्या धर्माची नाही, माणुसकीची भाषा समजा,” असं म्हणत सय्यदने दहशतवाद्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्याने एका दहशतवाद्याची रायफल हिसकावण्याचा प्रयत्न केला, परंतु गोळीबारात तो गंभीर जखमी झाला. रुग्णालयात नेण्यात आले, पण तेव्हा उशीर झाला होता. त्याच्या शौर्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. मित्र बिलालने नम्रतेने म्हटलं, “जर सय्यद नसता, तर कोण वाचलं असतं?”

सुदीपला जीव गमवावा लागला
 
या हल्ल्यात नेपाळचा तरुण सुदीप न्युपाने याचा मृत्यू झाला. आई रीमा पांडे, बहीण सुषमा आणि मेहुणा युवराज यांच्यासोबत तो सहलीला गेला होता. काठमांडूमधून सार्वजनिक आरोग्याचा अभ्यास पूर्ण करून, तो बुटवलमधील दंत चिकित्सालयात काम करत होता. त्याच्या वडिलांची प्रकृती धोकादायक असून, ते बेशुद्ध अवस्थेत आहेत. काश्मीरला जाण्यापूर्वी कुटुंब दिल्लीला गेले होते. इंडिया गेटजवळचा त्यांच्या शेवटच्या सहलीचा फोटो, आता केवळ एक हृदयस्पर्शी आठवण बनून राहिला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0