अमरावती : ( PhonePe Farmer Fraud ) उमेश पुनसे यांची विविध तीन बँकांमध्ये खाती आहेत. ते नियमित या तिन्ही बँक खात्यांमध्ये त्याच्या शेती आणि व्यवसायासाठी पैसे जमा करतो. जून 2024 मध्ये आरोपी क्रिश डाखोरे, उमेश पुनसे यांच्या घरी राहायला ( PhonePe Farmer Fraud ) आला. यावेळी क्रिश हा उमेशचा मोबाइल वापरायचा तसेच प्रतिभा आणि गौरव हे देखील अनेक दिवस उमेश सोबत राहत होते. फेब्रुवारी 2025 मध्ये त्याला एक मोठा धक्का बसला. उमेश पैसे काढण्यासाठी बँकेत गेला तेव्हा त्याच्या लक्षात आले की त्याच्या खात्यातून फोन पे द्वारे काही पैसे काढण्यात आले आहेत.
तिवसा पोलिस ठाणे हद्दीतील इसापूर गावात 55 वर्षीय शेतकऱ्याचा मोबाइल वापरून 6 लाख 69 हजार रुपये आणि घरातून 5 लाख 15 हजार रुपयांची रोकड चोरीला गेली. शेतकरी उमेश भीमराव पुनसे (55, इरसापूर, तिवसा) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी क्रिश महेंद्र डाखोरे (19), प्रतिभा महेंद्र डाखोरे (42), गौरव महेंद्र डाखोरे (24, सर्व रा. टीचर्स कॉलनी, तिवसा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
क्रिशने उमेशच्या मोबाईलवर फोन पे उघडून चार बँक खात्यातून एकूण 6 लाख 69 हजार रुपये इतर ठिकाणी ट्रान्सफर केले. तसेच आरोपींनी 30 मार्च 2025 रोजी घरातील कपाटात ठेवलेली 5 लाख 15 हजारांची रोकडही चोरून नेली. आरोपींनी एकूण 11 लाख 79 हजार रुपयांचा ऐवज चोरून फसवणूक केल्याची फिर्याद उमेश पुनसे यांनी तिवसा पोलिस ठाण्यात दिली.