Terror Attack Supporter Arrested : भ्याड हल्ल्याचा आनंद साजरा करणाऱ्याला बेड्या ! झारखंड पोलिसांची कारवाई

24 Apr 2025 16:38:43

so
 
रांची : ( Terror Attack Supporter Arrested ) जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यावर आपला आनंद व्यक्त करणाऱ्यावर पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मीडियावर दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा आणि पाकिस्तानचे अभिनंदन करणाऱ्या मोहम्मद नौशादला झारखंडमध्ये अटक करण्यात ( Terror Attack Supporter Arrested ) आली आहे. बुधवारी पोलिसांनी बोकारो मधील मखदुमपुर येथून आरोपीला बेड्या ठोकल्या आहे.
 
कोण आहे मोहम्मद नौशाद ?
 
35 वर्षीय आरोपी मोहम्मद नौशादने बिहारमधील एका मदरशातून कुराण शिकून पदवी ( Terror Attack Supporter Arrested ) मिळवली. सध्या तो त्याच्या वडिलांसोबत बोकारोमध्ये राहतो. त्याचा एक भाऊ दुबईत असतो. त्याने त्याच्याच नावावर असलेल्या सिम कार्डचा वापर करून या सर्व सोसिअल मीडिया प्लॅटफॉर्मवर असे लिहिले आहे. नौशाद इंस्टाग्राम, एक्स (पूर्वीचे ट्विटर) आणि फेसबुक वर हे सर्व संदेश लिहिले. बुधवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या जीवितहानीबद्दल संपूर्ण देश शोक करत असताना, नौशाद रात्री दहशतवाद्यांना अभिनंदन करत होता.
 
हिंदू संघटनांवर निशाणा
 
नौशादने एक्सवर उर्दूमध्ये पाकिस्तानचे अभिनंदन करताना आरएसएस, भाजपा, बजरंग दल आणि माध्यमांना लक्ष्य केले होते. तर त्याने पुढे आपल्याला अधिक आनंद होईल, असे लिहिले होते. यासोबतच त्याने तीन स्मायली इमोजी वापरून आपला आनंद व्यक्त केला. या मुख्य ट्विट नंतरही त्याने अनेक ट्विट केले आहे. ज्यात त्याने खूप आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर गोष्टी लिहिल्या आहेत. नौशादच्या ट्विटनंतर लोकांनी झारखंड पोलिसांना खूप मोठया प्रमाणात टॅग केले. त्यासोबत त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी करत होते. नौशाद हा आरोपी या आधीही सोशल मीडियावर खूप चिथावणीखोर गोष्टी लिहित आहे. यापूर्वीही लोकांनी त्याच्याबद्दल झारखंड पोलिसांकडे तक्रार केली होती. आता पुन्हा एकदा त्याने पुलवामा हल्ल्यावरून मर्यादा ओलांडल्या आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0