मुंबई : ( Farmer Solar Empowerment ) शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी दिवसा वीज उपलब्ध करुन देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 च्या अंमलबजावणीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मुंबईत ऊर्जा विभागातील अधिकाऱ्यांचे, जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीस अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डिकर, राज्याच्या अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र, अपर मुख्य सचिव (महसूल) राजेश कुमार आणि इतर महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते.
या योजने अंतर्गत राज्यभर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारले जात ( Farmer Solar Empowerment ) आहेत. ज्यामुळे कृषी फीडरला सौर उर्जेवर चालवता येईल. आतापर्यंत 1359 मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प पूर्ण झाले असून, त्यामुळे 2 लाख 14 हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळू लागली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत आणखी 15,284 मेगावॅट सौर प्रकल्पांच्या कामाला सुरूवात केली आहे. एकूण 16 हजार मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प जगातील सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प ठरणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळवण्याच्या मागणीला पूर्णतः उत्तर दिले जाईल. या योजनेची अंमलबजावणी सप्टेंबर 2026 पर्यंत पूर्ण होईल.
मुख्यमंत्री यांनी यावेळी सिंगल विंडो पोर्टलचे उद्घाटन केले, जे योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी तयार करण्यात आले आहे. त्यांनी योजनेच्या अंमलबजावणीच्या तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींचा आढावा घेतला आणि संबंधित अधिकाऱ्यांना प्राधान्याने अडचणी दूर करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी सांगितले की, सरकारच्या योजनांना गती देण्यासाठी योग्य धोरण आणि अचूक अंमलबजावणी आवश्यक ( Farmer Solar Empowerment ) आहे.
योजनेच्या प्रभावी कार्यान्वयनामुळे महावितरणला वीज प्रदान करण्याचा खर्च कमी होईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवण्याच्या अनुदानाची आवश्यकता कमी होईल. या योजनेला राष्ट्रीय स्तरावर सुमारे 20 पुरस्कार प्राप्त झाले आहेत, ज्यात इंडियन स्मार्ट ग्रीड फोरमचा राष्ट्रीय पुरस्कार आणि स्कोच पुरस्कार समाविष्ट आहेत. केंद्र सरकारनेही या योजनेचे कौतुक केले आहे आणि इतर राज्यांना याचे अनुकरण करण्याची सूचना दिली आहे.