नागपूर : ( National Security Alert ) काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने देशातील अंतर्गत सुरक्षेला प्राधान्य देत कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत, देशात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी व्हिसाधारक नागरिकांना तातडीने भारत सोडण्याचे आदेश देण्यात ( National Security Alert )आले आहेत.
गुप्त शोध मोहीम सुरू
या पार्श्वभूमीवर पोलिस विभाग, विशेष शाखा व गुप्तचर यंत्रणांनी संयुक्तरीत्या युद्धपातळीवर तपास सुरू केला आहे. रहिवासी भागांमध्ये गुप्त चौकशी, कागदपत्रांची तपासणी आणि सीमाभागात गस्त वाढवण्यात ( National Security Alert ) आली आहे. संशयित व्यक्तींवर बारकाईने नजर ठेवली जात असून, कायद्याप्रमाणे आवश्यक ती कारवाई केली जाणार आहे. या कारवाईमुळे प्रशासनासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
ओळख व पडताळणी मोठे आव्हान
या नागरिकांची ओळख पटवणे, त्यांच्या कागदपत्रांची वैधता तपासणे व कायदेशीर प्रक्रिया राबवणे हे कठीण आणि वेळखाऊ काम असल्याचे सांगण्यात येते. मात्र, देशाच्या सुरक्षेसाठी हे पाऊल अनिवार्य आहे. नागपूरसारख्या मोठ्या शहरांमध्ये अशा नागरिकांची उपस्थिती ही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चिंताजनक ठरत आहे, त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
924 जणांना मिळाले नागरिकत्व
पाकिस्तान, अफगाणिस्तान व बांगलादेशातून आलेल्या हिंदू नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी केंद्र सरकारने कायद्यात बदल केला आहे. याअंतर्गत आतापर्यंत नागपूर जिल्ह्यात 924 जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात सुमारे 3,500 पाकिस्तानी नागरिक आहेत, त्यापैकी 2,500 हून अधिकजण विविध व्हिसावर येथे आहेत. काही जण व्हिसामुदतीनंतरही देशात वास्तव्यास असल्याचा संशय असून, त्यांची चौकशी सुरू आहे. हे संपूर्ण काम प्रशासनासाठी मोठे आव्हान आहे.