दिल्ली : ( Pakistan Military Weakness ) ग्लोबल फायरपॉवर इंडेक्स 2025 नुसार, भारताचे सैन्य हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक सामर्थ्यवान सैन्य ठरले आहे. भारताकडे सुमारे 14.55 लाख सक्रिय आणि 11.55 लाख राखीव सैनिक आहेत. याशिवाय 4,614 रणगाडे, 1.51 लाख चिलखती वाहने आणि 3,243 ओढलेल्या तोफा आहेत. निमलष्करी दलात तब्बल 25.27 लाख जवान कार्यरत आहेत. दुसरीकडे, पाकिस्तानकडे 6.54 लाख सक्रिय आणि 5 लाख राखीव सैनिक आहेत. त्यांचा लष्कर जगात सहाव्या क्रमांकावर असला तरी 3,742 रणगाडे, 50,523 चिलखती वाहने आणि 752 स्व-चालित तोफा याच मर्यादित संख्या त्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण ( Pakistan Military Weakness ) करते.
समुद्रातही भारताचा वरचष्मा
भारतीय नौदल हे एक पूर्ण क्षमतेचे 'ब्लू वॉटर नेव्ही' आहे, ज्याच्याकडे 294 नौदल प्लॅटफॉर्म, दोन विमानवाहू नौका, 18 पाणबुड्या आणि 14 विनाशक जहाजे आहेत. अणुऊर्जा पाणबुडींमुळे भारताला महत्त्वाचा सामरिक फायदा मिळतो. त्याउलट, पाकिस्तानचे नौदल हे मुख्यतः किनारी सुरक्षेपुरते 'ग्रीन वॉटर नेव्ही' आहे. त्यांच्या ताफ्यात 114 जहाजे आणि केवळ 8 पाणबुड्या आहेत. 1971 च्या युद्धात भारताने कराची बंदरावर प्रभावी हल्ला करत पाकिस्तानला मोठे नुकसान ( Pakistan Military Weakness ) दिले होते.
हवाई शक्तीतही भारत पुढे
भारतीय हवाई दलाकडे 2,229 विमाने, ज्यामध्ये 600 लढाऊ आणि 899 हेलिकॉप्टर आहेत. आधुनिक क्षेपणास्त्र, पूर्वसूचना यंत्रणा, आणि संरक्षण प्रणालींमुळे भारत जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानकडे 1,434 विमाने आहेत, यामध्ये 387 लढाऊ आणि 57 हल्ला करणारी हेलिकॉप्टर यांचा समावेश ( Pakistan Military Weakness ) आहे.
अर्थव्यवस्था आणि अणुशक्तीचा तुलनात्मक आढावा
भारताकडे 120-130 अण्वस्त्रे तर पाकिस्तानकडे 150-170 अण्वस्त्रे असल्याचा अंदाज आहे. मात्र, अशा युद्धात दोन्ही देशांचे अपरिमित नुकसान होईल. भारताचा GDP पाकिस्तानपेक्षा 10 पट अधिक असल्याने पाकिस्तान दीर्घकाळ युद्ध लढण्याच्या स्थितीत नाही. त्यामुळे त्यांची युद्धसज्जता ही कागदापुरती मर्यादित आहे.
पाकचा इतिहास - पराभवाची मालिका
1947, 1965, 1971 आणि 1999 या चारही युद्धांमध्ये पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला आहे. 1971 मध्ये देशाचे दोन भाग झाले, तर 1999 मध्ये आपले सैनिक ओळखण्यासही पाकिस्तानने नकार दिला होता. अलीकडील पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर तणाव वाढला असून पाकिस्तानचे पंतप्रधान सिंधू पाणी करार रद्द करण्याची भाषा करतात. मात्र भारतासमोर पाकिस्तानची लष्करी ताकद ही फक्त धमकीसारखीच वाटते, जी प्रत्यक्षात फारशी प्रभावी नाही.