नागपूर : ( Porn Video Claim ) एका वैवाहिक वादाने गंभीर वळण घेतले, जेव्हा पतीने पत्नीविरोधात थेट तक्रार दाखल केली. त्याने आरोप केला की, पत्नी एका पॉर्न वेबसाइटवर आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहे. ही तक्रार प्रथम न्यायदंडाधिकाऱ्यांकडे फेटाळली गेल्यानंतर, पतीने उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायमूर्ती एम. डब्ल्यू. चांदवानी यांच्या एकल खंडपीठाने देखील पतीची याचिका फेटाळून लावली.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, तक्रारीत कुठेही असे नमूद नाही की पत्नीने स्वतःहून तो व्हिडिओ अपलोड केला किंवा प्रसारित केला आहे. तसेच कोणतेही बेकायदेशीर डिजिटल कृत्य केल्याचेही संकेत नाहीत. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा सिद्ध होत नाही. याचिकेतील आरोप केवळ संशयावर आधारित असून, कायदेशीर कारवाईसाठी ठोस पुराव्यांची आवश्यकता आहे, असे न्यायालयाने ( Porn Video Claim ) स्पष्ट केले.
तसेच, पत्नीने अपशब्द वापरल्याच्या आरोपाबाबत न्यायालयाने नमूद केले की, संवाद घरातील चार भिंतींमध्ये घडल्याने कोणताही साक्षीदार उपलब्ध नाही. त्यामुळे हा आरोपही ग्राह्य धरता येत नाही. परिणामी, उच्च न्यायालयाने पतीची याचिका फेटाळून लावली. तक्रारदार पतीने पत्नीवर भारतीय दंड संहितेच्या कलम 500 अंतर्गत मानहानीचा आरोप केला होता. पत्नी घरी अपमानास्पद भाषा वापरत असल्याचा दावा त्याने केला होता. मात्र, यासाठी कोणताही साक्षीदार उपलब्ध नसल्याने कनिष्ठ न्यायालयाने ही तक्रार आधीच फेटाळली होती. त्यानंतर, तक्रारदाराने माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी ( Porn Video Claim ) केली.
पतीच्या मते, एका अज्ञात व्यक्तीने त्याला माहिती दिली की त्याची पत्नी एका पॉर्न साइटवर एका पुरुषासोबत अश्लील कृत्य करताना दिसते आहे. पतीने स्वतःही तो व्हिडिओ पाहिला असल्याचा दावा केला व पत्नीला ओळखले असल्याचे सांगितले. जेव्हा पत्नीला याबाबत विचारण्यासाठी पोलीस ठाण्यात चलण्यास सांगितले, तेव्हा तिने नकार दिला, त्यामुळे पोलिसांनीही कोणतीही कारवाई केली नाही.