Ladaki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना फसविले, कोण म्हणालं 2100 रुपयांचा वादा खोटा

Top Trending News    28-Apr-2025
Total Views |

ladaki
मुंबई : ( Ladaki Bahin Yojana ) महाराष्ट्रातील महायुती सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चांगलीच यशस्वी ठरली आहे. या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. याचा योजनेबाबतात आता लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या पैश्याबाबत आणखी एक वाद निर्माणझाला आहे. महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत लाडक्या बहिणींची 1500 रुपयांची असलेली रक्कम वाढवण्याची घोषणा केली होती. ही रक्कम 2100 रुपये करणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्यातील सर्वच लाडक्या बहिणी 2100 रुपये कधी मिळणार ? त्याची वाट पाहत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते मंत्री नरहरी झिरवळ यांच्या वक्तव्याने वादांग निर्माण केले आहे. 1500 रुपयांमध्ये सर्व लाडक्या बहिणी खूश आहेत. 2100 रुपये देणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. बहिणींना 2100 रुपये देऊ असे कुणीही म्हटलेच नाही, असे म्हणत महायुती सरकारमधील मंत्री नरहरी झिरवाळ यांनी हात झटकले आहेत. यामुळे आता दिलेल्या शब्दाला काहीच महत्व नसल्याचे जाणवत आहे.
जळगाव येथे माध्यमांशी बोलताना मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, लाडक्या बहिणींना ( Ladaki Bahin Yojana ) 2100 रुपये देऊ, असे कोणीही म्हटलेले नाही. यापूर्वी विरोधक लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देखील देणार नाहीत, असा दावा करत होते. मात्र पंधराशे रुपये दिल्यानंतर विरोधकांनी आता 2100 रुपयांवर जास्त जोर धरला आहे. मला वाटते पंधराशे रुपये ही रक्कम देखील परिपूर्ण आहे. महिला पंधराशे रुपये मिळाल्यानंतरही खुश आहेत, असे झिरवाळ म्हणाले.