Pakistan In Crisis : पाकिस्तान सरकारच्या अडचणीत वाढ

28 Apr 2025 16:50:51
 
paki
 
इस्लामाबाद : ( Pakistan In Crisis ) पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढणे अगदी साहजिकच आहे. या बाबतीत भारत मोठ्या कठोर धोरणांची अंमलबजावणी करणार आहे. पहलगाम हल्ल्यातील गुन्हेगार जगाच्या कोपऱ्यात कुठेही लपले तरी त्यांना शोधून शिक्षा केली जाईल, असे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार थांबवून भारताने हे सिद्ध केले आहे की यावेळी ते मोठी पावले उचलण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. दरम्यान, पाकिस्तानी तज्ज्ञ उमर फारूख यांनी तीन कारणे सांगितली आहेत ज्यामुळे पाकिस्तानने भारताचा इशारा हलक्यात ( Pakistan In Crisis ) घेऊ नये.
 
पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर कमकुवत
 
आता आंतरराष्ट्रीय राजकारणात लष्करीदृष्ट्या कमकुवत देशांवर हल्ला करणे हे एक सामान्य नियम बनले आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानने हा इशारा हलक्यात घेऊ नये. आता जेव्हा एखादा लष्करीदृष्ट्या शक्तिशाली देश कमकुवत देशावर हल्ला करतो तेव्हा आंतरराष्ट्रीय निषेध होत नाही. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात आणि इस्रायलच्या पॅलेस्टाईन मोहिमेत हे स्पष्ट झाले आहे. आज, वॉशिंग्टन, तेल अवीव आणि पॅरिसचे नवी दिल्लीशी घनिष्ठ संबंध आहेत. ते केवळ भारताला शस्त्रास्त्रे पुरवत नाहीत तर ते नवी दिल्लीला राजनैतिक पाठिंबा सुद्धा ( Pakistan In Crisis ) देत आहेत.
 
लष्करीदृष्ट्या शक्तिशाली भारत
 
गेल्या पाच वर्षांत भारताने अमेरिकेकडून किमान 20 अब्ज डॉलर्सची शस्त्रे खरेदी केली आहेत. भारत किमान तीन ठिकाणांहून शस्त्रे खरेदी करत आहे. भारताच्या शस्त्रास्त्रांचे इतर स्रोत फ्रान्स आणि इस्रायल आहेत. या शस्त्रांमुळेच आज भारतीय लष्करात पाकिस्तानपेक्षा लष्करी श्रेष्ठता दिसते आहे.
 
कोणताही दबाव नाही
 
वॉशिंग्टनची धोरणात्मक शाखा आता भारतासोबत संयुक्त लष्करी नियोजनाबद्दल बोलत आहे. एफबीआय आणि राष्ट्रीय गुप्तचर सेवा सारख्या संस्थांचे संचालक संयुक्त लष्करी नियोजनाबद्दल बोलत आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानला खूप काळजीपूर्वक पुढे जाण्याची गरज आहे. आतापर्यंत पाश्चात्य गटाने भारत-पाकिस्तान लष्करी संकटाचे पूर्ण युद्धात रूपांतर होण्यापासून रोखण्यासाठी राजनैतिक भूमिका बजावली. 1987 पासून भारत-पाकिस्तान मधील प्रत्येक लष्करी संकटात युद्ध टाळण्यात वॉशिंग्टनने भूमिका बजावली आहे. परंतु यावेळी ते शक्य नाही.
Powered By Sangraha 9.0