Princess Itka Klett : 22 लाखांची एन्गेजमेंट रिंग धबधब्यात पडली तरीही राजकुमारी हसत परतली, काय घडलं ?

29 Apr 2025 19:26:45

pr 
 
छिंदवाडा : ( Princess Itka Klett ) चेक रिपब्लिकची राजकुमारी इटका क्लेट तिच्या मणक्याच्या आयुर्वेदिक उपचारांसाठी छिंदवाडा येथे पोहोचल्या होत्या. त्यांना सोशल मीडियाद्वारे डॉ. टाटा यांच्या आयुर्वेदिक उपचारांबद्दल माहिती मिळाली. उपचारादरम्यानच त्यांनी तामिया आणि पाताळकोटला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली होती. येथे फिरत असताना, छोटा महादेव धबधब्यावर एक घटना घडली. आणि ती कासावीस झाली.
 
राजकुमारी इटका क्लीट ( Princess Itka Klett ) तामिया येथील छोटा महादेव धबधबा पाहण्यासाठी आली होती. नैसर्गिक सौंदर्याच्या सान्निध्यात ती पाण्यात खेळत असताना अचानक तिची 22 लाख रुपयांची साखरपुड्याची अंगठी धबधब्यात पडली. अंगठी सोबत तिच्या चेहऱ्यावरील हास्यही मावळले. पाणावलेल्या डोळ्यांनी तिने अंगठी शोधण्याचा प्रयत्न केला. जवळपास उपस्थित असलेल्या पर्यटकांनीही मदत केली पण सहा तासांच्या अथक परिश्रमानंतरही यश आले नाही. अखेर, राजकुमारी निराश होऊन छिंदवाड्याला परतली.
 
अशी मिळाली अंगठी
 
या घटनेनंतर, छोटा महादेव येथे लिंबूपाणी दुकान चालवणाऱ्या मनोज विश्वकर्मा यांनी राजकुमारीची अंगठी शोधून ती परत आणण्याची जबाबदारी घेतली. मनोजने जवळच्या गावातील डझनभर आदिवासी तरुणांना बोलावले. त्या तरुणांनी ठरविले की, अंगठी सापडेपर्यंत ते प्रयत्न करत राहतील. आणि शोधकार्य सुरु झाले. धबधब्याच्या थंड पाण्यात उतरणे आणि वाळू काढणे, पाणी काढणे आणि ती गाळणे यात कित्येक तासाचा वेळ जात होता. दिवसरात्र केलेल्या कष्टाचे फळ मिळाले आणि दोन दिवसांनी वाळूमध्ये मौल्यवान अंगठी सापडली. जेव्हा अंगठी सापडल्याची बातमी राजकुमारीला ( Princess Itka Klett ) कळली तेव्हा तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिने आदिवासींना 5 लाख रुपये देण्याची ऑफर दिली. पण त्या तरुणाने पैसे घेण्यास नकार दिला. तो म्हणाला, 'तुम्ही आमचे पाहुणे आहात. तुमच्या वेदनेची किंमत आम्ही ठरवू शकत नाही. आदिवासींनी त्यांच्या कष्टाचे फक्त 41 हजार रुपये मजुरी घेतली.
 
भारतीयांनी मन जिंकले
 
या घटनेनंतर राजकुमारी ( Princess Itka Klett ) म्हणाली की, भारताने पुन्हा एकदा मन जिंकले आहे. येथील लोक केवळ जमिनीशीच जोडलेले नाहीत तर हृदयाशीही जोडलेले आहेत. ती म्हणाली हा अनुभव कधीही विसरणार नाही. ती उपचारासाठी आली होती, पण इथल्या लोकांच्या प्रामाणिकपणाने तिच्या मनालाही स्पर्श केला. भारताच्या आदरातिथ्यासोबत आदिवासींच्या प्रामाणिकपणाचे जगासमोर उदाहरण ठेवले.
 
 
Powered By Sangraha 9.0