One Sided Love : सांग माझा नंबर ‘ब्लॉक’ का केला ? म्हणत त्याने काढला राग, अन् मग....

Top Trending News    30-Apr-2025
Total Views |

one
 
नागपूर : ( One Sided Love ) रोज तिच्याकडे पाहता पाहता तो तिच्यावर प्रेम करू लागला. ती दोन मुलांची आई आहे हे माहिती असूनही तिच्यावर एकतर्फी प्रेम करू लागला. पीडित 30 वर्षीय महिला ही दोन मुलांची आई आहे. आरोपी संदीप आई-वडील आणि भावासोबत राहतो. तो कुठलाच कामधंदा करीत नाही. दिवसभर टवाळक्या करीत असतो. पीडित महिला कामानिमीत्त घराबाहेर पडली की, संदीप तिच्याकडे टक लावून पाहायचा. मात्र, पीडित महिला दुर्लक्ष करायची. हा प्रकार तिने पतीकडेही सांगितला. सामान्य घरातील लोक असल्याने त्याच्याकडे दुर्लक्ष करीत होते. मात्र, त्याची प्रेमाची तडफ अधिकच ( One Sided Love ) वाढत गेली.
 
त्याने खूप प्रयत्न करून मोबाईल नंबरही मिळविला. वारंवार तिला फोन करून त्रास देऊ लागला. संदीप पीडितेशी बोलण्यासाठी धडपड करीत होता. त्याने महिलेचा मोबाईल नंबर मिळविला. वारंवार फोन करून त्याने तिला त्रास देण्यास सुरूवात केली. त्यामुळे महिलेनी त्याचा मोबाईल नंबर ब्लॉक केला. यामुळे संतापलेल्या युवकाने सांग माझा नंबर ‘ब्लॅक लिस्ट’ का केला, अशी विचारणा करीत गैरवर्तन केले. या प्रकारामुळे तो अस्वस्थ झाला. तो महिलेचा पाठलाग करायचा. घटनेच्या दिवशी म्हणजे 27 एप्रिल रोजी तो थेट महिलेच्या घरी ( One Sided Love ) गेला.
 
‘सांग माझा फोन नंबर ब्लॉक का केला. मला तू खूप आवडतेस’ असे म्हणून तिच्याशी गैरवर्तन केले. या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. सुपर स्पेशालिटीतील पदव्युत्तरच्या जागा वाढणार पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत त्याला अटक केली. संदीप (30) असे त्या प्रेमवेड्याचे नाव आहे. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदवून संदीपला अटक केली. न्यायालयाच्या आदेशाने त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.