Pahalgam Attack Report : पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत अमेरिकन वृत्तपत्राचा दावा काय ?

30 Apr 2025 15:02:43

amer 
 
न्यूयॉर्क : ( Pahalgam Attack Report ) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती आहे. दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याबद्दल भारताने विविध राजनैतिक अधिकाऱ्यांना काही गुप्तचर माहिती दिल्याचा दावा केला जात आहे. यामध्ये पाकिस्तानशी संबंधित असलेल्या गुन्हेगारांच्या चेहऱ्यावरील ओळख डेटाचा समावेश आहे. परराष्ट्र मंत्रालयाने या संदर्भात 100 हून अधिक मिशनच्या राजदूतांनी माहिती दिली आहे. या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे भारताने स्पष्टपणे ( Pahalgam Attack Report ) म्हटले आहे.

अमेरिकन वृत्तपत्राचा दावा
 
दरम्यान, एका अमेरिकन वृत्तपत्राने आपल्या वृत्तात दावा केला आहे की पहलगाम हल्ला पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या आदेशावरून झाला. अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाईम्सने तज्ज्ञ आणि राजदूतांच्या हवाल्याने दावा केला आहे की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत लवकरच पाकिस्तानवर हल्ला करू शकतो. भारत पाकिस्तानवर प्रत्युत्तर हल्ल्यासाठी तयारी करीत आहे. परराष्ट्र मंत्रालयाने या संदर्भात 100 हून अधिक मिशनच्या राजदूतांनी माहिती दिली आहे. या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे भारताने स्पष्टपणे म्हटले आहे. वृत्तपत्रानुसार, हल्ल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डझनभराहून अधिक जागतिक नेत्यांशी बोलून त्यांना हे सांगितले आहे. असेही मानले जाते की दहशतवाद्यांनी जनरल मुनीर यांच्या आदेशावरून हल्ला केला कारण त्यांना पाकिस्तानमधील सत्तेवर नियंत्रण ( Pahalgam Attack Report ) मिळवायचे होते.
 
अमेरिकन वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अनेक संघर्षांमुळे जगभरात अराजकता पसरत असताना भारताला आपल्या कृतीचे समर्थन करण्यासाठी कोणतेही स्पष्टीकरण देण्याची आवश्यकताही वाटत नाही. पश्चिम आशियात इस्रायल आणि हमास यांच्यात सुमारे 18 महिन्यांपासून हिंसक संघर्ष सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत 50 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरू होऊन तीन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीसाठी प्रयत्न सुरू आहेत, परंतु आतापर्यंत 10 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि नजीकच्या भविष्यात संघर्ष थांबण्याची आशा नाही.
 
 
Powered By Sangraha 9.0