Bihar to Shirdi Pulsar Mystery : शिर्डीत अवतरली बिहारची पल्सर ! जाणून घ्या सविस्तर वृत्त

Top Trending News    05-Apr-2025
Total Views |
 
shirdi
 
शिर्डी : ( Bihar to Shirdi Pulsar Mystery )  शर्मा हे ग्रॅज्युएट आहे. पण नोकरी नाही. हार्डवेयर दुकानावर काम करतात. कर्ज घेऊन त्यांनी नवी कोरी गाडी घेतली होती. ती गाडी सहा महिन्यातच चोरी गेली. तरी देखील त्यांनी प्रामाणिकपणे कर्जाचे सर्व हप्ते भरून गाडी आपल्या मालकीची केली. परंतु, ती गाडी चोरीला गेली होती. कुठलीही आशा नसताना हरवलेली वस्तू परत ( Bihar to Shirdi Pulsar Mystery ) भेटल्याचा आनंद फार मोठा असतो. साई बाबांनी केलेला हा चमत्कारच आहे, असे ते म्हणाले, शिर्डीत आयुष्यात पहिल्यांदा आलो, यापुढे दरवर्षी येणार असा नवस त्यांनी यावेळी साईबाबांना बोलला आहे.
 
 
साईबाबा सुपर स्पेशिलीटी हॉस्पिटलसमोर पार्किंगमध्ये एक बेवारस पल्सर मोटर सायकल सापडली ( Bihar to Shirdi Pulsar Mystery ) . दरम्यान, तपासात गाडीचा क्रमांक महाराष्ट्र पासिंगचा होता व तो नंबर खोटा होता, अशी माहिती पुढे आली. गाडीचा ड्रॉप बॉक्स खोलून पाहिला तर त्यात आग्रा, उत्तर प्रदेश येथील मालकाच्या नावाचे पेपर्स मिळाले. त्यावरून पोलिस उपनिरीक्षक रोहीदास माळी यांनी माहिती घेतली असता पेपर्सही बनावट असल्याचे निदर्शनास आले. मग चेसिस आणि इंजिन क्रमांकावरून शोध घेतला तर, शिर्डीत सापडलेली ही पल्सर बिहारमधील अररिया जिल्ह्यातील लक्ष्मण शर्मा यांची असल्याची निष्पन्न झाले. दरम्यान, शर्मा यांचा मोबाईल क्रमांक प्राप्त करून त्यांना फोन केला. त्यांना त्यांची पल्सर सापडल्याचे समजताच ते भावूक झाले. ‘साईं बाबा की जय हो’ म्हणत त्यांनी अश्रूंना बांध फोडल्याचे दिसले. सर्व कागदपत्रे घेऊन शर्मा हे शिर्डीत आले. ते दुपारपर्यंत जेवलेले नव्हते. मात्र गाडी भेटल्याच्या आनंदात पोट भरल्याचे सांगून त्यांनी आभार मानले.