Hashim Musa : कमांडो ते कठोर दहशतवादी ! तो बनला तोयबाचा चेहरा

01 May 2025 18:34:14

musa
 
श्रीनगर : ( Hashim Musa ) पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागील दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी भारतीय लष्कर सातत्याने प्रयन्त करत आहे. भारतीय लष्करासोबत सुरक्षा संस्था हाशिम मुसा नावाच्या दहशतवाद्याचाही शोध घेत आहे. हाशिम पूर्वी पाकिस्तानी सैन्यात कमांडो म्हणून तैनात होता. सुरक्षा यंत्रणांमधील सूत्रांनी सांगितले की, हाशिम दक्षिण काश्मीरच्या जंगलात कुठेतरी लपून बसला आहे. त्याला पकडण्यासाठी मोठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी त्याला गैर-काश्मिरी लोकांवर आणि सुरक्षा दलांवर हल्ला करण्यासाठी एका खास मोहिमेवर काश्मीरला पाठवले आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये काश्मीरमधील गंदरबल येथील गगनगीर येथे झालेल्या हल्ल्यातही मुसा ( Hashim Musa ) सहभागी होता.
जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी मुसाबद्दल माहिती देणाऱ्याला 20 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. माहिती देणाऱ्याची ओळख गुप्त ठेवली जाईल असे आश्वासन दिले आहे. सर्व सुरक्षा यंत्रणांना शंका आहे की दहशतवादी पाकिस्तानात पळून जाण्याचा प्रयत्न करेल. मिळालेल्या माहितीनुसार मुसाने पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपमध्ये पॅरा कमांडो म्हणून काम केल्याचे उघड झाले आहे. नंतर तो लष्कर-ए-तैयबामध्ये सामील झाला. तेव्हापासून तो अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी आहे. जर मुसा जिवंत पकडला गेला तर तो पाकिस्तानविरुद्ध थेट पुरावा असेल. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी त्याला गैर-काश्मिरी लोकांवर आणि सुरक्षा दलांवर हल्ला करण्यासाठी एका खास मोहिमेवर काश्मीरला पाठवले आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये काश्मीरमधील गंदरबल येथील गगनगीर येथे झालेल्या हल्ल्यातही मुसा सहभागी होता.
Powered By Sangraha 9.0