Modi Breaks Legacy : मोदींनी मोडले गांधी-नेहरूंचे विक्रम, आता फक्त एकाची वाट

10 May 2025 09:37:53

modi bre
 
दिल्ली : ( Modi Breaks Legacy ) पंतप्रधान मोदींनी आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम मोडीत काढले आहे. आता सुद्धा त्यांची वाटचाल त्याच दिशेने सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिवंगत पंतप्रधान आणि आयर्न लेडी इंदिरा गांधी यांचा बांगलादेश निर्मितीचा विक्रम मोडतील का ? अशा चर्चाना आता उधाण येत आहे. या चर्चेचे कारण म्हणजे, पंतप्रधान मोदी यांनी नेहरू-गांधी कुटुंबातील दोन माजी पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू आणि दिवंगत राजीव गांधी यांचे विक्रम ( Modi Breaks Legacy ) आधीच मोडले आहेत. त्यामुळे आता कोणत्या विक्रमाची वेळ आहे, हे पाहणे महत्वाचे ठरत आहे.
 
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी पंचायतीमध्ये महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता तर मोदी संसदेत महिलांसाठी 33 टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात यशस्वी झाले आहेत. संसदेतून हा कायदा मंजूर करण्यात त्यांना यश आले आहे. तर, पंडित नेहरू सलग तीन वेळा पंतप्रधान होणार होते. पंतप्रधान मोदींनी सलग तीन वेळा पंतप्रधान बनून या विक्रमाची बरोबरी केली आहे. तथापि, भाजपाचे म्हणणे आहे की मोदींनी प्रत्यक्षात पंडित नेहरूंचा विक्रम मोडला ( Modi Breaks Legacy ) आहे. याचे कारण म्हणजे पंडित नेहरू पहिल्यांदाच नामांकित पंतप्रधान होते तर मोदी हे सलग तीन वेळा निवडून आलेले पंतप्रधान आहेत.
 
आता फक्त एकच विक्रम मोडीत ( Modi Breaks Legacy ) निघण्याचाही वाट पहिली जात आहे. तो म्हणजे, नेहरू-गांधी कुटुंबातील मोदींसमोर इंदिरा गांधींच्या विक्रमाची बरोबरी करणे किंवा तोडणे हे एकमेव आव्हान उरले होते. दिवंगत इंदिरा गांधी यांनी त्यांच्या कारकिर्दीत पूर्व पाकिस्तानला पाकिस्तानपासून वेगळे केले होते. त्यानंतर ते बांगलादेश नावाचे स्वतंत्र देश बनले. पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर या विक्रमला आता मोडीत काढल्या जाईल का ? अशी चर्चा आता सर्वत्र सुरु आहे.
Powered By Sangraha 9.0