US Mediation Buzz : ही संधी भारतासाठी अत्यंत महत्त्वाची, सोशल मीडियावर अमेरिकेच्या मध्यस्थीचे वारे

11 May 2025 06:00:29
 
buzz
 
दिल्ली : ( US Mediation Buzz ) गेल्या आठवडाभरापासून भारत पाकिस्तान या दोन देशांमधला तणाव वाढला आहे. युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या तीन ते चार दिवसात पाकिस्तानने भारताच्या शहरांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, भारताने पाकिस्तानच्या हल्ल्यांना यशस्वीपणे परतावून लावले. परिणामी शहरांचे नुकसान टळले आहे. त्यानंतर भारताने देखील ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून एअर स्ट्राइक केला तसेच पाकिस्तान मधील विविध एअर बेस उध्वस्त केले. युद्धजन्य परिस्थिती शांत व्हावी यासाठी अमेरिकेने मध्यस्थी केली आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, जाहीर करताना आनंद होत असल्याचे सांगत भारत आणि पाकिस्तानने तत्काळ युद्ध बंदीचा निर्णय घेतला असल्याचे ट्विट केले. महत्त्वाचे म्हणजे अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर भारताच्या परदेश मंत्र्यांनीही या निर्णयाची पुष्ट केली. त्यानंतर सोशल मीडियावर भारतीयांनी नाराजीचा सूर उमटविणे सुरू केले. अमेरिकेला आत्ताच मध्यस्थी करणे आवश्यक होते का ? असे अनेक युजर्स विचारू लागले आहेत.
 
पाकिस्तानची सध्याची बिकट परिस्थिती पाहता, ही संधी भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती पुन्हा मिळण्याची शक्यता कमी आहे, असे अनेक भारतीयांचे मत आहे. युद्धाने आर्थिक आणि मनुष्यहानी होते हे जरी खरे असले तरी, पाकिस्तानला नमवण्यासाठी आणि त्यांच्या कारवायांना कायमचा पायबंद घालण्यासाठी हीच योग्य वेळ आहे, असे मत सोशल मीडियावर अनेकजण व्यक्त करत आहेत.
 
बलुचिस्तान, टीटीपी आणि सिंधमधील अस्थिरतेचा उल्लेख परत अनेकांनी पाकिस्तानमधील अशांततेचा फायदा भारताला मिळू शकतो आणि पाकिस्तानला नमवण्यासाठी ही चांगली संधी आहे, असे मत व्यक्त केले. अनेक भारतीयांची पाकव्याप्त काश्मीर (POK) भारताच्या नियंत्रणात यावा अशी तीव्र इच्छा आहे. मात्र, भारताने पाकिस्तानवर केलेल्या जोरदार हल्ल्यांमुळे, आता केवळ पाकव्याप्त काश्मीरच नव्हे, तर संपूर्ण पाकिस्तानात भारताचा दबदबा निर्माण होऊ ( US Mediation Buzz ) शकतो, अशी भावनाही सोशल मीडियावर व्यक्त केल्या.
 
काही युजर्सच्या मतानुसार, तुर्की आणि चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, परंतु ती भारतीय संरक्षण दलांनी निष्प्रभ ( US Mediation Buzz ) ठरवली. त्यामुळे, भविष्यात तुर्की आणि चिनी शस्त्रास्त्रांची मागणी कमी होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचा भारतावरचा हल्ला अयशस्वी ठरल्यामुळे, तुर्कीच्या संरक्षण उद्योगाचाही हिरमोड झाला असावा, असे काही भारतीयांना वाटते.
 
एकंदरीत, सोशल मीडियावर व्यक्त झालेल्या या भावनांवरून असे दिसते की, अनेक भारतीयांना पाकिस्तानच्या सध्याच्या अडचणींचा फायदा घेऊन, त्यांच्यावर निर्णायक कारवाई करण्याची आणि दीर्घकाळ चाललेला सीमापार दहशतवाद व अस्थिरता संपवण्याची तीव्र इच्छा आहे. ही संधी भारतासाठी ऐतिहासिक ठरू शकते, असेही काहीजण मानतात. तथापि, या परिस्थितीत भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावरची प्रतिक्रिया ( US Mediation Buzz ) आणि संभाव्य परिणामांचा विचार करून अत्यंत सावधगिरीने पाऊले उचलावी लागतील.
 
 
Powered By Sangraha 9.0